Dr. Sudhir Tambe: शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडविण्यावर भर देणार

जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आमदार सुधीर तांबे यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
MLC Dr Sudhir Tambe with congress leaders
MLC Dr Sudhir Tambe with congress leadersSarkarnama

जळगाव : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (dr. Sudhir Tambe) यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारांच्या नोंदणीबरोबरच (voters registration) गाठीभेटींना सुरवात केली आहे. नुकताच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात संपर्क दौरा केला. यादरम्यान त्यांनी विविध संस्थांना भेट (visits various institutions) देऊन शिक्षण क्षेत्रातील समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. (Graduate constituency MLC Dr. Sudhir Tambe on Jalgaon tour)

MLC Dr Sudhir Tambe with congress leaders
Amit Thackrey: अमित ठाकरेंकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट

जळगाव शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्राला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर वकील संघाला भेट देऊन त्यांनी जिल्हा वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. केतन ढाके यांचे अभिनंदन केले.

MLC Dr Sudhir Tambe with congress leaders
Balasaheb Thorat: आदिवासी हेच आपल्या देशाचे मालक

रविवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सर्वसाधारण सभेलाही ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी सोसायटीत नव्याने निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करत शिक्षकांचे प्रश्‍नही जाणून घेतले.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीला भेट देऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमांचा शुभारंभ केला. या वेळी त्यांच्या समवेत शिक्षक संघाचे पदाधिकारी आर.एच. बाविस्कर, शिक्षक पतपेढीचे चेअरमन एस.डी. भिरुड, एच.जी. इंगळे, ग.स. सोसायटीचे चेअरमन उदय पाटील, जिल्हा प्राथमिक संघाचे अध्यक्ष अजित चौधरी, नंदन वळीकर, शैलेश राणे, प्रा. सुनील गरुड, शैलेंद्र (छोटू) खडके, प्रदीप पाटील उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com