मी नाशिकला, १२९४ कोटींचे पॅकेज दिले, विरोधकांनी काय दिले?

हतगड येथे भाजपतर्फे झालेल्या आदिवासी नागरिकांच्या जाहिर सभेत भारती पवार यांचे आदिवासी मंत्र्यांवर टिकास्त्र.
Dr Bharti Pawar
Dr Bharti PawarSarkarnama

सुरगाणा : आमचे विरोधक म्हणतात भाजप (BJP) काहीच काम करीत नाही. त्यांनी नाशिकसाठी (Nashik) काय केले?. मी कोरोनाकाळात नाशिकसाठी १,२९४ कोटींचे पॅकेज दिले. राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांनी (Trible Minister) नाशिकसाठी काय दिले?, काय काम केले, ते सांगावे, असे आव्हान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिले.(Dr. Bharti Pawar said i have given 1294 crores package to Nashik In Covid19 epidemic)

Dr Bharti Pawar
नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला करोडो रुपये दिले, ते खर्च करा आणखी देऊ!

हतगड (ता. सुरगाणा) येथे भाजपतर्फे आदिवासी शेतकरी व शेतमजूरांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री अशोक उईके, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे आदी होते.

Dr Bharti Pawar
`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

त्या म्हणाल्या की, भारताने कोरोनाकाळात १९० कोटींहून अधिक लशीच्या मात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात, तसेच नव्वदपेक्षा जास्त देशात लस पोचविली आहे. अनेकांकडून महाराष्ट्रात भाजप काहीच काम करीत नाही, असे भ्रमित केले जात आहे. विरोधक म्हणतात नाशिकला काय दिले, असा सवाल उपस्थित केला जातो. एक हजार २९४ कोटींचे पॅकेज कोरोनाकाळात दिले आहे. या वेळी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, संजू पाटील, अन्न सुरक्षा मानव प्राधिकरण सचिव नवी दिल्ली, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, भाजप आदिवासी विकास आघाडीचे सरचिटणीस एन. डी. गावित, प्रकल्प अधिकारी विकास मिणा, आदिवासी क्षेत्रातील उद्योजक तुकाराम कर्डिले, समीर चव्हाण आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com