रक्षा खडसे म्हणाल्या, न्याय मिळेल, माझा न्यायालयावर विश्‍वास!

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात केले वक्तव्य.
BJP MP Raksha Khadse
BJP MP Raksha KhadseSarkarnama

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसेंवरील (Eknath Khadse) ‘ईडी’च्या (ED) कारवाईसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायव्यवस्थेला आपण मानतो, त्यामुळे त्यातून योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजप (BJP) खासदार तथा खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी व्यक्त केली. (Eknath Khadse`s daughter in law raksha khadse comment on Ed Case)

BJP MP Raksha Khadse
अवैध सावकाराचे पाळेमुळे खोदणाऱ्या धुळे पोलिसांची पाठ थोपटली!

भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. खडसेंवरील कारवाई त्या यंत्रणेच्या दृष्टीने योग्य असेल, मात्र आमच्या दृष्टीने ती योग्य नाही. शिवाय, आपण सर्व न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत, त्यामुळे याबाबत न्यायालय योग्य निर्णय करेल, असे त्या म्हणाल्या.

BJP MP Raksha Khadse
आयुक्त रमेश पवारांच्या नजरेने काढला गणवेष भ्रष्टाचाराचा एक्सरे!

राज्य सरकारकडून राजकारण

केंद्र सरकारच्या योजनांबाबत राज्यातील सरकार नेहमीच राजकारण करत आले आहे. घरकुल योजनांच्या संदर्भात अनेक पात्र लाभार्थ्यांना डावलून अन्य लोकांची नावे पुढे करण्यात आली. आपल्या जिल्ह्यात ‘रुरबन’अंतर्गत तीन ठिकाणी क्लस्टर झाले. केंद्र सरकार ६० टक्के व राज्य सरकारचा त्यासाठी ४० टक्के निधी होता. मात्र राज्याने निधीच दिला नाही, म्हणून केंद्राचाही निधी परत गेला. असे बऱ्याच योजनांबाबत होते, असा आरोपही खासदार खडसे यांनी केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com