मी आठ वर्षात ४० वर्षांच्या विकासाचा बॅकलॉग पूर्ण केला!

नंदुरबार लोकसभा मतदार संघात विकास प्रकल्पांना गती दिल्याचा खासदार हीना गावित यांचा दावा
मी आठ वर्षात ४० वर्षांच्या विकासाचा बॅकलॉग पूर्ण केला!
Dr Heena Gavit News, Nandurbar NewsSarkarnama

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप (BJP) सरकारचे आठ वर्ष पूर्ण झाले. या आठ वर्षात सेवा, सुशासन, गरीब कल्याण हे तीन तत्त्वांवर जनकल्याणाचे व सर्वांगिण विकासाचे काम करण्यात आले. मागील ४० वर्षातील केंद्र सरकारने जे केले नाही ते या आठ वर्षात करून ४० वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात यश आले आहे. अशी माहिती खासदार डॉ. हीना गावित (Dr Heena Gavit) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Dr Heena Gavit claimed nandurbar devolopment works is on)

Dr Heena Gavit News, Nandurbar News
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची नाशिकला जय्यत तयारी

खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षापासून मला नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा नेतृत्वाची संधी मिळाली आहे. मतदार संघातील आठही तालुक्यात सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या योजना पोचवून गोर गरिबांना न्याय देण्याचा व खुंटलेला विकास साधण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे. (Nandurbar News)

Dr Heena Gavit News, Nandurbar News
जयंत पाटील म्हणाले, तुमचे प्रश्न सोडविणार!

कोरोनाशी सामना करत विविध प्रकल्प व जनकल्याणाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोचविण्यात आल्या. नंदुरबार लोकसभा मतदार संघात गरीब कल्याणासोबतच विकासाचे ड्रीम प्रोजेक्ट यशस्वीरीत्या राबविण्यात आले. त्यात नंदुरबार -मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळविली. माझ्या टु डू लिस्ट मध्ये असलेल्या भुसावळ खानदेश एक्स्प्रेस, पुणे रेल्वे सेवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेद्वारे १२ लाख लाभार्थ्यांना दरमहा एक किलो गहू, चार किलो तांदूळ मोफत दिले. पंतप्रधान शहरी आवास योजनेत दोन हजार ३६१ घरांना मंजुरी दिली. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेत ९६ हजार ७४३ घरांना मंजुरी दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन लाख ७१ हजार ८४५ स्वच्छतागृह बांधले. हर घर नल से जल योजनेत २०२३ पर्यंत एक लाख ४८ हजार ८७२ व २०५३ पर्यंत दोन लाख ८९ हजार ४३६ नळ कनेक्शन देण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजनेत दोन हजार ७७२ फेरीवाल्यांना तीन कोटी ५५ लाखाचे कर्ज वाटप केले. उज्वला योजनेतंर्गत दीड लाखापेक्षा जास्त गॅस जोडणी दिली. जनधन योजनेत पाच लाख ७८ हजार ८८६ महिलांचे खाते उघडले. स्टॅंडअप इंडिया योजनेत ३८ लोकांना आठ कोटी सहा लाख कर्ज वाटप केले., मुद्रा योजनेत ३० हजार ९५० लोकांना ११७. ५ कोटीचे कर्ज मंजूर केले. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत एक हजार ११० युवकांना प्रशिक्षण तर १८ लाख १९ हजार १२८ नागरिकांना आधार कार्डचे वाटप केले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in