मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील कार्यक्रमात व्यक्त केली खंत.
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!
Devendra Fadanvis Latest News in Marathi, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

नाशिक : मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच विधानसभा (Assembly election) निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी २०१९ मध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी `मी पुन्हा येईन` (I will come back) या वाक्याची पुनरूक्ती केली होती. हा धागा पकडत ते म्हणाले, `बोलल्याप्रमाणे मी पुन्हा आलो मात्र काही लोकांनी मला माजी करून टाकले` यावर उपस्थितांत चांगलीच खसखस पिकली. (Devendra Fadanvis Latest News in Marathi)

Devendra Fadanvis Latest News in Marathi, Nashik Latest Marathi News
राज ठाकरे, अयोध्या सोडा विमानतळाबाहेर पाय ठेऊन दाखवा!

यावेळी एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तो ज्या जागेवर झाला त्याचं जागेवर श्री. फडणवीस यांनी सन २०१९ मध्ये आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासाठी निवडणुकीची शेवटची प्रचार सभा घेतली होती. त्या सभेत देखील श्री. फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. तोच धागा पकडतं त्यांनी शेवटच्या सभेत मी पुन्हा येईन असे बोलले होतो. त्यानुसार मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी करून टाकल्याची मिस्कील टिप्पणी केली.

Devendra Fadanvis Latest News in Marathi, Nashik Latest Marathi News
दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

यावेळी ते म्हणाले, कोविड काळात राज्यातील सर्व रुग्णालयांना भेट देवून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले परंतु काही लोक घर बसल्या टीका करतं होते. परंतु निधड्या छातीने आव्हानांना सामोरे जाणाऱ्यांना लोक आठवणीत ठेवतात, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. आम्ही अडचणीच्या काळात लोकांपर्यंत गेल्याने आमच्या मागे लोक आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

ते म्हणाले, गोदावरी नदी वाहती राहिली पाहिजे, त्याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील दोन तृतीयांश भाग गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. नमामी गंगा प्रकल्पाच्या माध्यमातून नदी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे येथील मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेच्या अकराशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. नागपुरातील नाग नदी स्वच्छतेसाठी १९०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नमामी गोदा प्रकल्पासाठी देखील केंद्र सरकारकडून अठराशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्याचे आश्‍वासन श्री. फडणवीस यांनी दिले. कोविड काळात नाशिक महापालिका एकमेव अशी होती की, शहरात मोठे रुग्णालय खोलले. त्यामुळे नाशिकच्या प्रेमातून उतराई व्हायचे नाही.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, डॉ. अतुल वडगावंकर, एस.आर. रुंग्ठा, संजय अग्रवाल, नगरसेवक दिनकर पाटील, उद्धव निमसे, राहुल दिवे व प्रशांत दिवे, नामकोचे अध्यक्ष हेमंत धात्रक, सुमीत कुमट, पत्रकार हेमंत भोसले, प्रशांत बाग, पंकज जाधव, नितीन मुलतानी, कैलास देवरे, सिध्दार्थ वनारसे सागर विंचू, नम्रता ॲडव्हर्टाईजचे आबा देशमुख आदींचा सत्कार करण्यात आला. किशोर बेलसरे यांनी प्रास्ताविक केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.