हक्काचा माणूस म्हणून मला हाक द्या!

आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड येथे ‘आमदार आपल्या दारी’ मोहिम सुरू केली.
हक्काचा माणूस म्हणून मला हाक द्या!
MLA Suhas Kande News, Nashik Latest Marathi News Sarkarnama

मनमाड : आमदार हा जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कोणत्याही अडीअडचणी निसंकोच सांगा, हक्काचा माणूस म्हणून हाक द्या, तुमच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यापासून ते शिवसैनिकापर्यंत (Shivsena) आणि सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी- कर्मचारी तुमच्यासाठी काम करतील, असे आवाहन आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केले. राज्यातील पहिलाच प्रयोग असलेला ‘आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना आमदार कांदे यांनी सुरु केली. (MLA Suhas kande begans mass public contact drive in Nandgaon)

MLA Suhas Kande News, Nashik Latest Marathi News
कांदा दरप्रश्‍नी राज्य सरकारला अल्टिमेटम!

आमदार कांदे यांच्या संकल्पनेतून ‘आमदार आपल्या दारी’ या मोहिमेला सोमवारी मनमाडमधून सुरवात झाली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अंजुम कांदे, युवा जिल्हाप्रमुख फरहान खान, ज्येष्ठनेते अल्ताफ खान, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते, तालुका आरोग्य विभागाचे डॉ. संतोष जगताप, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता संदीप शिंदे, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी नितनवरे, बांधकाम खात्याचे अधिकारी श्री. खैरनार, कृषी विभागाचे श्री. पवार उपस्थित होते. (Nashik Latest Marathi News)

MLA Suhas Kande News, Nashik Latest Marathi News
महसूलच्या प्रत्येक बदलीत एक-दीड कोटींची वसुली!

आमदार कांदे म्हणाले, एखाद्या प्रभागात रस्ता नाही, लाईट नाही, नाले सफाई केली जात नाही, कचरा उचलला जात नाही, स्वच्छता केली जात नसेल, रेशनवर धान्य मिळत नसेल तर थेट संपर्क साधा. आमच्याकडे तक्रार नोंदवा. तत्काळ त्यावर उपाय शोधून आपल्या समस्या सोडविल्या जातील. इतकेच नव्हे तर उच्चशिक्षणासाठी जायचे असेल तर बायोडाटा द्या आम्ही तजवीज करू, नोकरी हवी असेल तर नाशिक येथे कंपनीमध्ये प्रयत्न करून रोजगार, शिक्षणाकडे देखील लक्ष दिले जाईल.

या वेळी जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका संघटक संजय कटारिया, जाफर मिर्झा, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, विनय आहेर, दिनेश घुगे, शहर संघटक महेंद्र गरुड, पिंटू वाघ, निलेश व्यवहारे, सुभाष माळवतकर, गोटू केकान, मुन्ना दरगुडे, अमीन पटेल, सचिन दरगुडे, अंकुश गवळी, सिद्धार्थ छाजेड, योगेश इमले उपस्थित होते. शहरप्रमुख महेश बोरसे यांनी प्रास्ताविक, नाना पाटील, अनिल दराडे यांनी सूत्रसंचालन केले.

आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात जवळपास १७२ नागरिकांच्या समस्यांचे तक्रार अर्ज दाखल झाले. नगरपालिकेच्या कर्मचारी चकोर यांचे सेवेत असताना कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचा धनादेश आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in