Satyajeet Tambe News: मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता, भाजपच्या उमेदवारीची चर्चा खोटी : सत्यजीत तांबे यांचे स्पष्टीकरण

Mahrashtra Politics : सत्यजीत तांबे यांनी चर्चेला स्वत:हून पूर्णविराम दिला
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

Mahrashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर काँग्रेसकडून डॉ. तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

Satyajeet Tambe
'Bharat Jodo' समारोपाला विरोधक जोडोचा प्रयोग; महाराष्ट्रातून ठाकरे-पवारांनाही पत्र, उपस्थित राहणार का?

तर दुसरीकडे भाजपचे अजुनही तळ्यात मळ्यात सुरु आहे. असे असतानाच नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसचे (Congress) युवा नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र सत्यजीत तांबे यांनी या चर्चेला स्वत:हून पूर्णविराम दिला आहे.

सत्यजीत तांबे याबाबत बोलताना म्हणाले, ''कोण काय म्हणतं? यापेक्षा मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ही सर्व चर्चा खोटी आहे'', असं सांगत या चर्चांवर सत्यजीत तांबे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Satyajeet Tambe
Government Job : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूषखबर ; 40 हजार पदांची भरती करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा!

तसेच ''भाजपकडून ऑफर असल्याची सर्व चर्चा निराधार आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आवाई उठवली गेली आहे. मी माझ्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि राहणार'', असंही सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajeet Tambe
Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये वेगळीच खेळी होणार; शिंदे गट अन् भाजप मोठ्या अपक्षाला देणार पाठिंबा?

दरम्यान, राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलेल्या विधानामुळे नाशिक पदवीधरमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण होणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे.

तर उद्या (दि.१२ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या नेमकी कोण उमेदवारी अर्ज भरणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in