सहकार उपनिबंधकांच्या निर्णयाने `त्या` महिला कृतज्ञतेने रडल्या

उपनिबंधकाच्या आदेशाने जळगावला सावकारी पाशातून शंभर एकर जमीन मुक्त.
Womens at Cooperative office
Womens at Cooperative officeSarkarnama

जळगाव : जिल्ह्यातील (Jalgaon) रावेर परिसरातील पंधरा शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर जमीन आठ सावकारांनी (Lenders) हडप केली होती. त्याविरोधात (Cooperative subregistrar) जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई (Santosh Bidwai) यांच्याकडे सुरू असलेल्या खटल्याचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत या जमिनी सावकारी पाशातून मुक्त करण्यात आल्या आहेत. (Jalgaon Cooperative department ordered to free farmers land from lender)

Womens at Cooperative office
Shocking: एसपी सचिन पाटील, मनसे नेते प्रदीप पवार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

या निकालाने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या कुटुंबीयांनी जिल्हा उपनिबंधक बिडवई यांचे आभार मानले. सावकारी कायद्यानुसार दिलेला या राज्यातील पहिलाचा मोठा निकाल आहे.

Womens at Cooperative office
Nashik; नगरसेवक प्रवेशावरून शिंदे गट तोंडावर पडला!

याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तब्बल ४७ वेळा सुनावणी झाली. याबाबत बुधवारी निकाल देत संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी ताब्यात दिल्याच्या आदेशाची प्रतही शेतकऱ्यांना देण्यात आली. या निकालाने उपस्थित शेतकऱ्यांचा पंधरा ते वीस वर्षांचा लढा यशस्वी ठरला असून, त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्याने शेतकऱ्यांना रडू कोसळले. भावूक झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत उपनिबंधकांनी त्यांचे अश्रू पुसले.

जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकुमार मुकुंदा पाटील (रा. सावदा), मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशीनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, मधुकर तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, मुरलीधर सुदाम राणे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन कब्जा केला होता.

अशी लुबाडली जमीन

रावेर तालुक्यातील पंधरा शेतकऱ्यांनी १९९६ ते २००९ यादरम्यान या सावकारांकडून कर्ज घेतले होते. सावकारांनी कर्ज देण्याअगोदरच जमिनी त्यांच्या नावावर करून घेतल्या होत्या. या प्रकरणी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या. पोलिसांतही तक्रारही दिल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. हे अन्यायग्रस्त शेतकरी विदर्भातील वकील ॲड. गजानन गोचे यांच्याकडे पोचले. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी युक्तिवाद केला.

गतवर्षी सावकारांवर छापे

याप्रकरणी १७ ऑगस्ट २०२१ ला रावेरसह अनेक ठिकाणी आठही सावकारांच्या घरावर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने छापे टाकले होते. रावेर तालुका उपनिबंधक विजयसिंग गवळी यांनीही अवैध सावकाराबाबत जिल्हा उपनिबंधकांना विशेष अहवाल सादर केला होता. जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांनी याप्रकरणी शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा चंग बांधला. पहिली केस ३ जानेवारी २०१९ ला सुरू झाली. आतापर्यंत ४७ वेळा प्रकरणाची सुनावणी झाली. आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात सावकारांनी सर्व व्यवहार रोख स्वरूपात केला होता. दोन बॉन्ड सापडले, त्यात २० लाखांच्या कर्जाची नोंद होती. सावकारांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनी त्यांच्या असून, त्याचा मोबदला दिल्याचे सिद्ध करता आले नाही.

या शेतकऱ्यांना मिळाल्या जमिनी

पुंडलिक नथ्थू चौधरी (रा. उदळी खुर्द, रावेर), रमेश भास्कर पाटील (हंबर्डी, ता. यावल), रमेश लक्ष्मण चौधरी व नीलेश रमेश चौधरी (अट्रावल), सुरेश पाव्हणू फेगडे, चंदकुमार सुरेश फेगडे (उदळी, ता. रावेर), नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा, ता. यावल), रतिराम देवचंद पाटील (कोचूर, ता. रावेर), सुनील अर्जुन जावळे (कुसुंबे, ता. रावेर), उषाबाई टोपा जंगले (कुंभारखेडा), मंदाबाई मनोहर पाटील (कुंभारखेडा), भारती अनिल परदेशी (कोचूर बुद्रुक), लक्ष्मण बुधो ढिवर (उदळी, बुद्रुक), सोपान शामराव पाटील (उदळी बुद्रुक), ज्ञानदेव देवराम महाजन (उदळी खुर्द), श्रीकृष्ण दामू पाटील (उदळी बुद्रुक), रवींद्र भागवत जावळे (फैजपूर). यातील काही शेतकरी मृत झाल्याने त्यांच्या वारसांना शेतजमिनी परत देण्याचे आदेश आहेत.

एवढी शेतजमीन परत

एकूण पंधरा प्रकरणांत सुमारे शंभर एकर जमीन परत करण्यात आली. १५८.६३ चौरस मीटर प्लॉट परत करण्याचे आदेश आहेत. तीन सावकारांवर एक कोटी ८५ लाख ३५ हजार देणे निश्‍चित करण्यात आले आहे. निश्‍चित केलेले मूल्य महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम १७ (५) मधील तरतुदीनुसार सावकार मुरलीधर राणे यांनी ९० लाख ५८ हजार, नंदकुमार पाटील यांनी ८१ हजार ९७ हजार, दिलीप पाटील यांनी १२ लाख ८० हजार अशी रक्कम शेतकरी रवींद्र जावळे यांना द्यावयाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com