छगन भुजबळांनी अडीचवर्षात किती निधी आणला!

गिरीश महाजनांनी नाशिकच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्या विरोधात दंड थोपटले
छगन भुजबळांनी अडीचवर्षात किती निधी आणला!
Chhagan Bhujbal & Girish MahajanSarkarnama

नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पालकमंत्री (Guardian) या नात्याने राज्य सरकारकडून (Maharashtra Government) अडीच वर्षात किती निधी आणून दिला हे सांगावे असा सवाल करीत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिक शहराच्या राजकारणात भुजबळांविरोधात दंड थोपटले.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
राज ठाकरेंची हनुमान चालीसा तर अमित ठाकरेंची महाआरती!

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. काही कामांना स्थगिती देण्याबरोबरच सध्या सुरू असलेल्या कामावरून कानपिचक्या त्यांनी दिल्या. या पार्श्‍वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

या वेळी त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले. ते म्हणाले, सहाच नगरसेवक असल्याने भुजबळांना महापालिकेत जाता आले नाही. त्यामुळे आता प्रशासक राजवट आल्याने ते महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

शिवसेनेकडून हिंदुत्वाची आहुती

सत्तेसाठी शिवसेना कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकते. हिंदुत्वाची आहुती देण्यात आली, हेच मोठे उदाहरण आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल व्हिडिओवर शिवसेनेने कारवाई करून धर्मनिष्ठा दाखविण्याचे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.