NCP News: किती जणांना संपवणार, किंमत चुकवावीच लागेल..

अजित पवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

पाचोरा : राज्यात (Maharashtra) व देशात (India) ज्या पद्धतीने राजकारण (Politics) चालले आहे, ते आतापर्यंत कधीच पाहिले नाही. विरोधक (Opposition) संपविण्याचे कारस्थान केले जात आहे. अरे किती जणांना संपवणार, जरा आत्मचिंतन करा आणि फोडाफोडीचे राजकारण थांबवा हे लोकशाहीला (Democracy) घातक आहे. अशी टिका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाचोरा येथे केली. (NCP leader Ajit Pawar criticise BJP for purchasing opposition party MLAs)

Ajit Pawar
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

जिजाई रंगमंच, एम. एम. महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र इमारतीचे उद्घाटन व पाचोरा - भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar: शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकले?

ते म्हणाले, विचारधारा वेगळ्या असू शकतात, पण पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम मानला जातो. फोडाफोडीच्या राजकारणाने विकास होत नाही. प्रमुख विषयांकडून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करून सर्वसामान्यांचे सरकार आहे, असा कांगावा करत राज्यकारभार केला जात आहे.

याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी भाजप व शिंदे युती सरकारवर बोचरी टीका केली. शेतीमालाला भाव नाही, खते कीटकनाशकांची दरवाढ थांबायला तयार नाही, उत्पन्नाच्या दीडपट शेतमालाला भाव देऊ, अशा वल्गना करणारे आहेत कोठे? इंधन, गॅस दरवाढ थांबायला तयार नाही, सरकार का काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने आर्थिक घडी विसकटू दिली नाही, हे कॅटचा अहवाल सांगतो.

ते म्हणाले, गद्दार म्हटले की यांचे धाबे दणाणते. जर आपण गद्दारीच केली नाही मग यांना एवढे लागते कशासाठी? तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचा व राज्याचा कारभार सुस्तावला आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्री आहोत असे सांगून राज्यकारभार केला जात आहे. आमदारासारखी जबाबदार व्यक्ती हातपाय तोडू, चुन चुन के मारेंगे असे म्हणतात, हवेत गोळीबार करतात, खासदार पोलिस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालतात. अरे हे चाललंय काय? ही काय मोगलाई आहे का? कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे.

श्री. पवार पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांना एकेरी बोलत धमक्या दिल्या जातात, ते काय तुमचे घरगडी आहेत का? बकालेसारखा पोलिस अधिकारी बेताल वक्तव्य करतो. अंगावर पोलिस अधिकाऱ्याची वर्दी आली म्हणून त्यांना शिंगे फुटली काय. त्यांना कोणाची फूस व आशीर्वाद आहे हे शोधून काढावे व बकालेंना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आगामी सर्व निवडणुका शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढून भाजप व शिंदे गटाशी संघर्ष करायचा आहे.

गाजर दाखविण्याचे धंदे बंद करा

राज्याच्या आर्थिक विकासासाठी व बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी येणारा वेदांता प्रकल्प राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात आणता आला नाही. आपले अपयश लपवण्यासाठी आम्ही त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असा कांगावा केला जात आहे. अरे मोठाही प्रकल्प आणा, पण हाही सांभाळा. गाजर दाखविण्याचे धंदे बंद करा.

यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, करण खलाटे, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील (अमळनेर), जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एन. चौधरी, महेश कौंडिण्य यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वासुदेव वले यांनी आभार मानले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in