Shivsena: दादा भुसेंकडे ३०० बसेससाठी पैसे आले कोठून?

एकनाथ शिंदे यांचा मेळावा म्हणजे भाजपच्या मंडळींनी शिजवलेले महाराष्ट्रविरोधी कट कारस्थान.
Dada Bhuse & Babanrao Gholap
Dada Bhuse & Babanrao GholapSarkarnama

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे अचानक तीनशे बसेस आल्या कोठून? त्यासाठी पैसा (Money) आला कोठून?, असा प्रश्न शिवसेनेचे (Shivsena) उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मेळावा म्हणजे, मराठी माणसाचा, (Marathi) हिंदूंचा जाज्ज्वल्य (Original Hindu) आणि शिवसेनेचा (Shivsena) आवाज दडपण्यासाठी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी आखलेले कारस्थान आहे. (Eknath Shinde didn`t have a capacity for Mumbai Rally, It is BJP`s conspiracy)

Dada Bhuse & Babanrao Gholap
Crime: १४ लाखांचा गांजा पिकवणाऱ्या वृध्दाची कारागृहात आत्महत्त्या

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने ७५० वाहनांतून कार्यकर्ते नेणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात घोलप यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. ते म्हणाले, त्यांचा स्वतःचा अधिकृत पक्ष नाही, कार्यकारीणी नाही मग हे सगळे घडते कसे, हे जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे.

Dada Bhuse & Babanrao Gholap
Shivsena: `या` मुळे दसरा मेळाव्यात दिसणार नाशिकची ताकद!

श्री. घोलप म्हणाले, एव्हढ्या गाडया बुक केल्या, त्यासाठी पैसे कोठून आणले?. पैसे कसे येणार आहेत? हा प्रत्येक सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. नागरिकांना काहीच कळत नाही, असा समज कोणी करून घेऊ नये.

या कट कारस्थानासाठी फार मोठे डील झालेले आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माईंड दिसत नाही. कारण मी त्यांना लहानपणापासून बघतो आहे. मुख्यमंत्री शिंदे हा अतिशय साधा भोळा माणुस आहे. त्यांच्याकडे एव्हढी शक्ती, एव्हढे बळ, एव्हढे डोके नाही आहे. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे डोकं आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा त्यामध्ये फार मोठा वाटा आहे.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा सुरवातीपासून फार प्रयत्न होता की, शिवसेना थांबली पाहिजे. शिवसेनेला कुठे तीर थांबवले पाहिजे. शिवसेनेला संपवले पाहिजे. हे जे काही कट कारस्थान आहे, ते शिवसेनेतून गेलेल्या चाळीस वेडयांना कळतच नाही. त्यांची मर्यादा, शक्ती आणि अजुन त्यांची औकात या बंडखोर आमदारांनी विचारात घेतलेली नाही.

श्री. घोलप पुढे म्हणाले, हे आमदार स्वतःच भाषण करताना त्यांची पुर्वपिठीका सांगतात. कोण पानाची टपरी चालवत होता. कोण म्हणतो मी हमाली करीत होतो. कोण सांगतो, मी मोलमजुरी करीत होतो. हे सगळं ते स्वतःच सांगतात. मग अचानक तीनशे गाडया दादा भुसे यांच्याकडे कशा आल्या?, कोणी दिल्या?. कोठून आल्या?. त्यासाठी पालकमंत्र्यांकडे पैसे कोठून आले?. याचा लोक विचार करतात, हे विसरू नका.

श्री. घोलप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेचाच दसरा मेळावा यशस्वी होईल. ती एक परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा म्हणजे प्रत्येक हिंदू नागरिक, शिवसैनिकासाठी विचारांचे सोने लुटण्याचा हा उत्सव असतो. त्यासाठी आम्ही कोणालाही गाडया करून दिलेल्या नाहीत. स्वयंस्फूर्तीने जेव्हढ्या गाड्या जाणार आहेत, त्याच एव्हढया असतील की, शिवसेना विरोधकांना धडकी भरेल. आम्ही कार्यकर्त्यांना सुचना केली आहे की, रस्ते खराब आहेत. त्यामुळे रेल्वेने जा. नाशिकहून तीन रेल्वेगाडया आहेत. त्यातून दहा हजार कार्यकर्ते जातील. हे सर्व मस्तपैकी भगवा झेंडा हाती घेऊन जातील. तेच त्यांचे तिकीट आणि जय हींद, जय महाराष्ट्र.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com