भाजपने बंडखोरांना शिवसेनेच्या दावणीला बांधायचे होते का?

गिरीश महाजन म्हणतात, अडीच वर्षापूर्वी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नाशिक : बंडखोर आमदारांना आदी सुरतला, नंतर गुवाहाटीला हलविण्यात, त्यांना सुविधा व सुरक्षा देण्याचे काम भाजपने (BJP) केले, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) करतात. मग त्यांची अपेक्षा काय होती, आम्ही शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दावणीला बांधायचे होते का?, असा प्रश्न भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. (Girish Mahajan claims, Shivsena didn`t keep his word to BJP)

Girish Mahajan
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे शिवसेना आमदारांना नापसंत पडले?

श्री. महाजन म्हणाले, शिवसेना नेते म्हणतात, पाठीत खंजीर खुपसला. पाठीत खंजीर खुपसणे कशाला म्हणतात. तुम्ही आमच्याबरोबर युती करून निवडून आले. पंतप्रधान मोदींचे फोटो लावले. तुमचे ११७ पैकी ५५ लोक निवडून आले. आमचे १०५ आले. आमचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा डबल होता. तरी तुम्ही आम्हाला पहिल्या दिवशी सोडू जातात. तुम्ही आमदारांना भेटत नाही. एकनाथ शिंदे सारख्या पॉवरफुल नेता गणतीत नाही. नेत्यांना बाजुला करून परिवारवाद केला जात आहे. स्वतः उद्धव ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या तिघांनी सर्व शिवसेना ताब्यात घेतली होती.

Girish Mahajan
हिंमत असेल तर शिवसेना सोडली हे जाहीर करा!

आम्ही खंजीर खुपसला नाही, त्यांच्यामुळे हे सर्व घडले. या बंडाला एकनाथ शिंदे कारण झाले. त्यांचे काम, अर्ध्या रात्री आमदारांच्या मदतीला धाऊन जाणे, लोकांना सहकार्य करणे यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढले. लोकांचा त्यांच्यासोबत उठाव झाला. तुमची अपेक्षा काय आहे की, लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे. आमदारांना आमच्याकडे पाठवायला पाहिजे, अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता.

अडीच वर्षापूर्वीचा हा फॉर्म्युला आधीच आमलात आला असता, तर हे काही झाले नसते. भाजपला आमदारांवर एव्हढा खर्च करावा लागला, तो करावा लागला नसता, या उद्धव ठाकरे यांच्या टिकेला महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मी सर्व घडामोडींचा साक्षीदार आहे. जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तेव्हा मी स्वतः मातोश्रीवर फोन केला. विशेष विमानाने त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी संख्या बघितली. भाजपचे १०५ आले आहेत. आपल्याकडे ५५ आहे. भाजप दोन्ही काँग्रेसकडे जाऊ शकत नाही. हा विचार करून त्यांनी आमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, शिवसेनेने दबावतंत्र वापरले. उलट यशिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या अनेक सभांना उपस्थित होते. त्यातील एकाही सभेत त्यांनी अडीच वर्षाचा फॉर्म्यूला सांगितला नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होईल असे सांगितले. त्यावेळी ठाकरे यांनी तो मुद्दा खोडून काढायला पाहिजे होता. आमच्या कानात सांगितले, बंद खोलीत सांगितले. हे सर्व बेसलेस आहे. त्याला काहीच अर्थ नाही. १९९५ पासून अनेक सरकारं आली, त्या त्या वेळी ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री राहिला. कमी आमदार असुनही मुख्यमंत्री झाल्याचे उदाहरण नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com