Adv. Rahul Dhikale; शहरासाठी उभारणार नवे २३२ कोटींचे रुग्णालय!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरीसाठी आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला.
Rahul Dhikale
Rahul DhikaleSarkarnama

नाशिक : शहरातील (Nashik) नागरिकांची वाढती मागणी व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) दृष्टिकोनातून रुग्णालयाची (Health) नितांत आवश्‍यकता आहे. त्यामुळे तीनशे खाटांच्या रुग्णालयासाठी केंद्र (Centre) व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. एक नवे रुग्णालय लवकरच आकाराला येईल, अशी माहिती भाजपचे (BJP) आमदार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी सांगितले. (New Hospital plan in Nashik city for newly expansion)

Rahul Dhikale
Eknath Shinde News; मुख्यमंत्र्यांची उत्तर महाराष्ट्रात राजकीय साखरपेरणी!

शहरातील नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या तीनशे खाटांच्या रुग्णालयाचा आराखडा तयार झाला आहे. एकूण २३२ कोटी रुपयांचा आराखडा आरोग्य मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात रुग्णालयाला निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Rahul Dhikale
Crime News; काँग्रेस शहराध्यक्षांच्या हत्त्येतील राजू सोनवणेची निर्दोष मुक्तता

नाशिक रोडच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाप्रमाणे सुविधा असलेले रुग्णालयाची मागणी पंचवटीकरांची आहे. पंचवटी विभागात स्लम एरिया, तसेच मळे विभाग मोठ्या प्रमाणात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात लाख भाविक नाशिकमध्ये येतात. पंचवटी विभागात महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय असले तरी या पन्नास खाटांच्या रुग्णालयात फक्त प्रसूती व लसीकरण केले जाते. त्यामुळे आपत्कालीन उपचारासाठी रुग्णालयाची मागणी होती. पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मालेगाव स्टॅन्ड महापालिकेच्या भांडार विभागातील महापालिकेच्या जागेवर रूग्णालय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्याअनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वैद्यकीय विभाग व नगररचना विभागाला जागेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा आराखडा निश्चित करण्यात आला. रुग्णालयात २५ विशेष तज्ञ, ३९ वैद्यकीय अधिकारी, २२४ स्टाफ नर्स, ६८ तांत्रिक, , २४ प्रशासनिक, १० डाटा एन्ट्री ऑपरेटर, ६० वॉर्डबॉय, ४८ आयांची पदभरती केली जाणार आहे. रुग्णालयासाठी वार्षिक जवळपास ३५ कोटी रुपये निधी खर्च होणार आहे.

रुग्णालयाची आवश्‍यकता

दोन ते पाच लाखांपर्यंत लोकसंख्या असल्यास २०० खाटांचे पाच ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असल्यास तीनशे बेडचे रुग्णालय उभारणे शक्य आहे. पंचवटी विभागात अंदाजित आठ लोकसंख्येचा विचार करून तीनशे खाटांचे रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. मालेगाव स्टॅन्ड वरील अग्निशामक दलाच्या कार्यालयाला लागून असलेली चौदा हजार १९४ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com