Suhas Kande news; ग्रामपंचायत निवडणुक बनली कांदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची

नांदगाव तालुक्यात मूळडोंगरी, नागापूरची निवडणूक बनली ‘हाय व्होल्टेज’
MLA Suhas kande
MLA Suhas kandeSarkarnama

नांदगाव : तालुक्यातील (Nandgaon) १४ ग्रामपंचायतींची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून, आपापल्या अस्तित्वाची लढाई निकराने लढण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांत टोकदार रंगत निर्माण झाली आहे. दरम्यान, असे असले तरी मूळडोंगरी व नागापूर येथील निवडणुकीत मात्र हाय व्होल्टेज स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकांत समर्थकांचा सरशी होणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas kande) यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. (Garmpanchayat elections is prestigious to MLA Suhas kande)

MLA Suhas kande
Manikrao Kokate news; सिन्नरच्या निवडणुकांत कोकाटे समर्थक जोमात?

आमदार सुहास कांदे यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचे मोठे आव्हान आहे. शिंदे गटात गेल्याने मतदारसंघावर पकड कायम असल्याचे कांदे यांना दाखवून द्यावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी समर्थकांना पडद्यामागून रसद पुरवली आहे. अनेकांना उघड समर्थन दिले आहे. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MLA Suhas kande
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

सरपंचपदासह सदस्यपदासाठीच्या येथील लढती रंगतदार ठरल्या आहेत. कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवण्यात आलेली नाही. व्हॉट्स ॲप ग्रुपवरचा वापर मोठ्या खुबीने करताना आपल्या हातून गावाचे कसे भले होत आहे, यासाठी आधुनिक साधनांचा मुक्त वापर देखील करण्यात येत आहे. त्यात डिजिटल फ्लेक्स, रस्त्यावरची बॅनर्सबाजी, सोशल मीडियातील व्हिडीओ व प्रचारातील गाण्यांचा पुरेपूर मारा होत असल्याने एखाद्या मोठ्या निवडणुकीचे स्वरूप यंदाच्या निवडणुकीला लाभले आहे.

नागापूर व मुळडोंगरी येथील निवडणुकीला प्रतिष्ठा लाभल्याने सगळ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे. दरम्यान, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी शुक्रवारी निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला. काही ग्रामपंचायतींच्या काही प्रभागांना संवेदनशीलतेची किनार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून यंत्रणनेने सतर्कता बाळगली आहे.

तालुक्यात पंधरापैकी शास्त्रीनगर येथील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरित बारा गावातील थेट सरपंच व १४ ठिकाणच्या एकूण ४० प्रभागातून ८७ उमेदवारांचे भवितव्य रविवारी बंद होणार असून, मंगळवारी मतमोजणीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण सतरा हजार ८९२ मतदार असून, त्यात ९५५४ पुरुष मतदार, तर ८३३७ स्री मतदार आहेत. एकूणच निवडणुक आता अंतिम टप्प्यात आली असून, निवडणूक शाखेने मतदानासाठी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. बाहेरगावी गेलेल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in