Manmad Bazar Samiti Result: शिर्डीच्या हॉटेलवर हायव्होल्टेज ड्रामा; महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर पोलिसी बळाचा वापर

Ahmednagar Bazar samiti Election| महाविकास आघाडीने आपले काही उमेदवार आणि जवळपास १६० मतदारांना शिर्डीतील हॉटेल थ्री जी मध्येमध्ये ठेवले होते.
Manmad Bazar Samiti Result:
Manmad Bazar Samiti Result:Sarkarnama

Manmad Bazar Samiti Result : राज्यात एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालांची रणधुमाळी सुरु आहे. पण दुसरीकडे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत वेगळाच व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. महाविकास आघाडीने आपले काही उमेदवार आणि जवळपास ४०० हुन अधिक मतदारांना शिर्डीतील एका हॉटेमध्ये थांबवलं होतं. पण पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या सर्व उमेदवारांना आणि मतदारांना हॉटेलमध्ये घुसून बाहेर काढलं. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

मनमाड कृषी उत्पन्न बाजर समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे सुहास कांदे आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. पण काल महाविकास आघाडीने आपले काही उमेदवार आणि जवळपास १६० मतदारांना शिर्डीतील हॉटेल थ्री जी मध्येमध्ये ठेवले होते. पण रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिर्डी पोलिसांनी हॉटेलमध्ये घुसून महाविकास आघाडीच्या मतदार आणि उमेदवारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे हॉटेल परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुमारे अर्धातास हा 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू होता. (APMC Election Result)

Manmad Bazar Samiti Result:
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीतील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मनमाड बाजारसमितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष दिपक गोगड, ठाकरे गटाचे नाशिक (Nashik) ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आणि १६० मतदार शिर्डीतील हॉटेल थ्री जी येथे थांबलेले होते. पण पोलिसांनी अचानक रूममध्ये घुसूनच मविआचे उमेदवार आणि अनेक मतदारांना बाहेर काढून चौकशी करू लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Ahmednagar APMC Election Result)

Manmad Bazar Samiti Result:
Bazar Samiti Result : बार्शीटाकळी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व; पण वंचितचीही दमदार 'एन्ट्री'

या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आणि मतदारांवर दबाव तंत्राचा आणि पोलीसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. यामुळे मतदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. (Maharashtra APMC Election Result)

पण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मतदार थांबलेल्या हॉटेलमध्ये नेमके कशासाठी गेल होते.याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण शिर्डीतील हॉटेलवर घडलेल्या या प्रकरामुळेआज या मनमाड बाजार समितीच्या निकालाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in