Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंना काँग्रेस नेत्यांची पडद्याआडून ‘रसद’ : पाचही जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

डॉ. तांबे यांनी गेल्या १५ वर्षांत केलेली कामे, सत्यजित यांची प्रतिमा यामुळे हे घडत असल्याचे काँग्रेसचेच लोक खासगीत सांगतात.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

नगर : विधान परिषदेच्या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरून ट्विस्ट निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. मात्र सध्या त्यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. काहींचा खुलेआम, तर काहींचा पडद्याआडून पाठिंबा मिळत आहे. डॉ. तांबे यांनी गेल्या १५ वर्षांत केलेली कामे, सत्यजित यांची प्रतिमा यामुळे हे घडत असल्याचे काँग्रेसचेच लोक खासगीत सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते गोंधळात सापडल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, आज पीएच.डी.धारकांसह विविध संघटनांनी सत्यजित यांना पाठिंबा जाहीर केला. (Hidden help of Congress leaders to Satyajeet Tambe, open support of activists)

काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांना निलंबित केले असले तरी शिक्षक व पदवीधरांशी संबंधित असलेल्या संघटनांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे तांबे यांचे बळ दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे पाच जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतानाच दुसरीकडे तांबे यांना ज्या पक्षातून निलंबित करण्यात आले, त्या काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते खुलेआम, तर काही पडद्यामागून त्यांचा प्रचार करत आहे. यावरून काँग्रेसच्या वरिष्ठांनी तांबे यांना निलंबित केले असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना मनापासून स्वीकारले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रचारासाठी खुलेआम मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

Satyajeet Tambe
Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

मागील १३ वर्षांत डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करताना पक्षविरहित माणसे जोडली. मनमिळावू व साधा स्वभाव, प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची वृत्ती व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गावोगावी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम डॉ. तांबे यांनी केले. विभागातील पाचही जिल्हे त्यांनी पिंजून काढले अरहेत. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणाच्या पलीकडे जाऊन डॉ. तांबे यांनी उमेदवारी दिलेल्या सत्यजित यांच्या पाठीशी कार्यकर्ते उभे राहिल्याचे दिसून येत आहे. पदवीधरांशी थेट मोबाईलद्वारे संपर्क साधताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सत्यजित यांचा प्रचार केला जात आहे.

Satyajeet Tambe
Moreshwar Temurde : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे झोपेतच हृदयविकाराने निधन

पीडीएफसह विविध संघटनांचा तांबेंना पाठिंबा

पीडीएफसह विविध संघटनांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘शिक्षकांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या टीडीएफ संघटनेने पुण्यात बैठक घेऊन सत्यजित तांबे यांच्यामागे संघटनेने ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संयुक्तपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना तांबे यांनी न्याय देण्याचे काम ताकदीने करेल, असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com