हेमंत गोडसे गेल्याने शिवसेनेला काडीचा फरक पडणार नाही!

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर घणाघाती टिका केली.
Sudhakar Badgujar & Hemant Godse
Sudhakar Badgujar & Hemant GodseSarkarnama

नाशिक : संघटनेत फारसा प्रभाव नसलेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे फुटीर गटात सहभागी झाले तरी त्याचा संघटनेवर काडीमात्र फरक पडणार नाही. खासदार गोडसे हे असेही भाजपच्या (BJP) अनेक वर्षांपासून संपर्कात होते, आज ना उद्या ते जाणार होते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी त्यांना दोनदा खासदार होण्याची संधी देऊनही पाठीत खंजीर खुपसला हे चुकीचे झाले, असा घणाघाती टोला शिवसेनेचे (Shivsena) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांनी लगावला. (Hemant Godse didn`t have any influence in Party organisation)

Sudhakar Badgujar & Hemant Godse
खासदार हेमंत गोडसे राजीनामा द्या; पुन्हा निवडून येऊन दाखवा!

युवा सेनेचे प्रमुख अध्यक्ष ठाकरे उद्यापासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरप्रमुख बडगुजर यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात चर्चा केली असता त्यांनी खासदार गोडसे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नाशिक शहर व ग्रामीणचा शिवसैनिक हा जागेवर आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शिवसैनिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मनोबल वाढले आहे. नाशिक मधील आमदार फुटीर गटात सहभागी झाले तरी संघटनेवर त्याचा काही फरक पडला नाही. कार्यकर्ता जागेवर आहे. शिवसेना व शिवसैनिक एक संघ आहे.

Sudhakar Badgujar & Hemant Godse
ओबीसी आरक्षण; महाविकासचे ९९ तर फडणवीसांचे १ टक्का योगदान!

नाशिक महापालिकेतील नगरसेवक देखील एकसंघ आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना अधिक जोमाने कामाला लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या ठिकाणचे आमदार गेले तेथे नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून तेथील देखील शिवसैनिक नवीन जोमाने कामाला लागून पक्षाची बांधणी करत आहे. सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक एक संघ आहे. मतदारांमध्ये देखील उत्साह आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल युवक, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आपुलकीचे भावना निर्माण झाली आहे. आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर २८८ पैकी १७० ते १७२ आमदार शिवसेनेचे राहतील असा दावा श्री. बडगुजर यांनी केला. शिवसैनिकांवर हल्ले होत आहे. याची दखल शिवसेना गंभीरपणे घेत असून मागून हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर समोरून वार करा, असे आवाहन त्यांनी शिवसेनेचे नेते बाळासाहेब कोकणे यांच्यावरील हल्ल्या संदर्भात प्रतिक्रिया देताना केले.

गोडसेंचा पक्ष संघटनेत शून्य प्रभाव

नाशिक लोकसभा मतदारसंघात दोनदा खासदार निवडून येत नाही ही परंपरा असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमंत गोडसे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन जोखीम पत्करले. त्यात गोडसे खासदार पदी निवडून आले ही जाण त्यांनी ठेवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे. अडचणीत असताना पक्ष सोडून जाण्याची ही वेळ नव्हती, त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. खासदार गोडसे शिवसेनेतून गेल्याने काहीच फरक पडणार नाही तसाही संघटनेत त्यांचा शून्य प्रभाव होता. शिवसैनिकांचे त्यांनी कधी काम केले नाही. उलटे भाजपच्या दावणीला सातत्याने बांधलेले होते. अनेक महिन्यापासून ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होते, असे बोलले जात होते असे महानगरप्रमुख बडगुजर म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com