Sanjay Raut; हेमंत गोडसे निवडून येणार नाही, डिपॅाझीट वाचले तरी खूप

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांना गद्दार संबोधले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नाशिक : गद्दारी (Rebel) करून पळालेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) पुन्हा निवडून येणार नाही. त्याची अनामत रक्कम (Election Deposit) वाचली तरी पुष्कळ होईल, असा सज्जड इशारा शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले नाशिकचे खासदार गोडसे यांना दिला आहे. (Shivsena leader Sanjay Raut criticise Rebel MP & MLA)

Sanjay Raut
Arvind Sawant : आजारपणावर केलेली टीका न शोभणारी; अरविंद सांवतांनी राज ठाकरेंना सुनावले

श्री. राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी नांदगावला शिवसेनेच्या मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर अतीशय तीव्र शब्दात हल्लाबोल केला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

Sanjay Raut
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

ते म्हणाले, राजकारण चंचल आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीचे सरकार देखील जाऊ शकते. मात्र सध्या त्यांच्यात जे सुरु आहे, त्यामुळे फक्त माहिती नाही तर तशी खात्री आहे. शिंदे गटात गेलेल्यांच्या मनात रोज नवे भय निर्माण होते आहे. त्यामुळे भय इथले संपत नाही. या भीती मुळेच ते निवडणूक घेत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले रक्त शिंपडून पक्ष बांधला. त्याविरुद्ध ज्यांनी काम केले, ते पाप त्यांच्या छाताडावर बसण्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही जिंकणारच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदार, खासदारांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, दिवार सिनेमामध्ये जसे अमिताभ बच्चनच्या `मेरा बाप चोर है` असे हातावर लिहले होते, तसेच शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या कपाळावर गद्दार हा शिक्का लागला आहे. जे खासदार गेलेत, ते प्यारे झाले. शिवसेना कार्यकर्ते त्यांची कबर खोदल्याशीवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com