हेमंत गोडसे नाशिकला; शिवसैनिक मात्र गेले `मातोश्री`वर

देवळाली कॅम्पच्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र
Uddhav Thakrey with Devlali`s Shivsena workers
Uddhav Thakrey with Devlali`s Shivsena workersSarkarnama

देवळाली कॅम्प : शिवसेना (Shivsena) सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाशी जवळीक केलेल्या खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) बंडखोरीनंतर काल पण निष्ठावंत आहोत, असा संदेश देत ते मातोश्रीवर गेले. मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, त्यांना कानमंत्र दिला. त्यामुळे खासदार गेले, मात्र कार्यकर्ते शिवसेनेतच राहिले अशी स्थिती झाली. (rebel Hemant Godse didn`t get support of loyalist Shivsena workers)

Uddhav Thakrey with Devlali`s Shivsena workers
आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार `माझे काय चुकले?`

खासदार हेमंत गोडसे यांचे मुळगाव संसरी-देवळाली कॅम्प आहे. हा परिसर शिवसेनेच्या आक्रमक व निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. (कै) राजाभाऊ गोडसे हे माजी जिल्हाप्रमुख तसेच माजी खासदार याच गावातील आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप हे पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे यांचे स्वागत त्यांच्या गावात केस होते, याची उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते मात्र पक्षाशीच एकनिष्ठ असल्याचा संदेश गेला आहे.

Uddhav Thakrey with Devlali`s Shivsena workers
चार सदस्यांचा प्रभाग ही राहणार केवळ चर्चाच !

मुंबईला गेलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांच्या ताकदीवर दोनदा खासदार केले पण गद्दारी केलीच गेले त्यांना जाऊ द्या. घराघरापर्यंत शिवसेना पोचवा. पुढील काळ हा युवा शक्तीचाच असल्याचे श्री. ठाकरे यांनी देवळाली कॅम्पमधील शिवसैनिकांना मंत्र देत जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. शुक्रवारी येथील शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी मातोश्री येथे जाऊन भेट घेतली.

या वेळी ज्येष्ठ नेते पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, चंद्रकांत गोडसे, वैभव पाळदे, रोहीत कासार, प्रशांत कोकणे, गोकुळ मोजाड, नितीन गायकवाड, पवन जाधव, संदीप मोगल, सचिन कांडेकर, प्रसाद पवार, विलास गिते, जय पारचा, रतन जाधव, मधुकर गोडसे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत स्वामी समर्थांची प्रतिमा भेट दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in