Jalgaon : हतबल महापौर म्हणाल्या, पाया पडते, पण खड्डे बुजवा!

संतापलेल्या महापौरांनी महासभेत आयुक्तांसह प्रशासनास दिली कारवाईची तंबी.
Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama

जळगाव : शहरातील (Jalgaon) सर्व रस्ते खराब झाले आहेत, तांबापूर भागातील खड्डयांमुळे झालेल्या अपघातामुळे माझ्या घरावर नागरिकांचे मोर्चे आले, नागरिकांच्या संतापामुळे मला शरमेने मान खाली घालावी लागली आहे. पाहिजे तर मी तुमच्या हातापाया पडते, मात्र याद राखा, यापुढे जर कामात कुचराई केली आणि जनतेला वेठीस धरले तर आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा कडक शब्दात महापौर (Mayor) जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांनी महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला तंबी दिली आहे. (Mayor Jayashree Mahajan Warns administration for pits on roads)

Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
हिंदूत्व नव्हे, इडीच्या धाकापोटीच ते भाजपसोबत गेले

महापालिकेची महासभा गुरुवारी सभागृहात झाली. पीठासीन अध्यक्षपदी महापौर जयश्री महाजन होत्या. यावेळी त्यांनी प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी आदेश देवूनही त्यांनी खड्डे बुजविण्याचे नियोजन केले नाही. अमृत योजनेच्या कामाचे नियोजनही केलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून आम्हाला त्यांची बोलणी खावी लागत आहे. हे सर्व केवळ प्रशासनाच्या ढिलाईपणामुळे होत आहे. आता हे सहन केले जाणार नाही, असे सांगितले.(Jalgaon Latest Marathi News)

Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे यावेळी उपस्थित होते. शहरातील विविध प्रश्‍नावर महासभेत चर्चा झाली.

शहरातील सुरू असलेल्या ‘अमृत योजना’ व ‘रस्त्यावरील खड्डे’ याबाबतचा प्रश्‍न नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यांनी रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे सांगितले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन संतप्त झाल्या त्या म्हणाल्या, होय हे खरं आहे. शहरातील सर्वच भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे, याच रस्त्यावरील खड्डयात एका वाहनाचा अपघात झाला, जखमी नागरिकांचे नातेवाईक व नागरिक आपल्या घरी आले व त्यांनी आपल्याला खडे बोल सुनावले आपल्याला ते ऐकून घ्यावे लागले आहे. केवळ प्रशासनाच्या दिरंगाईपणामुळे शहरातील नागरिकांचे बोलणे आम्हाला ऐकून घ्यावे लागत आहे.(Jayshree Mahajan News in Marathi)

४२ कोटींच्या रस्त्याचे काय?

शहरातील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याबाबत आपण नियोजन केले होते. ४२ कोटी रुपयाच्या निधीतून दहा रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्याबाबत सुचविले होत. परंतु या रस्त्यावर ‘अमृत’योजनेचे काम अपूर्ण सांगून त्या रस्त्याचे काम केलेच नाही. त्यामुळे आज त्या रस्त्यावर खड्डे असून नागरिकांना त्रास होत आहे. जर प्रशासनाने वेळीच काम केले असते तर हा प्रश्‍न निर्माण झाला नसता.

खड्डे बुजवा

शहरातील अनेक भागात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबत महापौर म्हणाल्या, आता खड्डे बुजविण्याबाबत तातडीने निर्णय घ्या आजच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ताबडतोब प्रशासनाला काम करण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले.

याद राखा, वेठीस धराल तर

शहरातील ‘अमृत’योजनेच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत महापौर म्हणाल्या अमृत योजनेचे काम आता गतीने पूर्ण करा कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यात अमृत योजनेचे काम पूर्ण झालेच पाहिजे. तसेच इतर छोटे, छोटे कामेही पावसाळ्यात चार महिन्यात पूर्ण करा, पाहिजे तर मी तुमच्या हातापाया पडते परंतु कामे वेगाने करा. जर जनतेला वेठीस धराल तर आपण संबंधितांवर कारवाई करण्यास हयगय करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शनिवार, रविवार तीन तास काम

महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अनेक फाईली थांबवून ठेवल्याचा आरोप करीत महापौर यांनी आयुक्तांना आदेश देत सांगितले, की अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करीत असतात, काही अधिकारी सुटीवर असल्याचे सांगितले जाते त्यामुळे फाईलचा निपटारा होत नाही. शासनाचा निधी उपलब्ध होवूनही कामे होत नाही, त्यामुळे आता शनिवार, रविवारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तीन तास कामावर बोलावून एका रांगेत त्यांना टेबल टाकून देवून फाईलींचा निपटारा करावा.

शरमेने मान खाली घालावी लागली

रस्त्यातील खड्डयामुळे नागरिकाच्या संतापाचा किस्साच महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितला, यावेळी त्या म्हणाल्या इच्छादेवी चौक ते डिमार्टपर्यंतचा रस्ता माझ्या प्रभागात येतो. आपण वाहनाने महापालिकेत येत असताना एका रिक्षावाल्याने आपल्या वाहनाच्या समोर रिक्षा लावून खड्डयामुळे होणाऱ्या त्रास सांगितला. मला या शहरात राहण्याची लाज वाटते, तुम्ही कसे येथे राहतात असे त्यांनी आपल्याला प्रश्‍न केला. आपण काहीही उत्तर दिले नाही, कारण चूक त्या रिक्षावाल्याची नव्हती तर प्रशासनाची होती, जर प्रशासनाने काम केले असते तर ही परिस्थिती आलीच नसती त्यामुळे आता तरी प्रशासनाने गतीने काम करावे

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com