Ahmednagar News: अहमदनगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग; कुणाची वर्णी लागणार?

Ahmednagar Politics: कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ahmednagar BJP
Ahmednagar BJP Sarkarnama

BJP News : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यासाठी सध्या चाचपणी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत अनेक जिल्ह्यात भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.

या पार्श्वभूमीवरच अहमदनगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.युवराज पोटे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवाजी गोंदकर यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या तरी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, ऐनवेळी अजून दुसऱ्या कुणाचे नाव समोर येते का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.

Ahmednagar BJP
Ahmednagar News : श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदासाठी संचालकांचे गुडघ्याला बाशिंग; अनेकांनी लावली फिल्डींग?

अहमदनगर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. याबरोबरच भाजपच्या नगर शहराध्यक्षपदीही नवीन नियुक्त होण्याची शक्यता आहे. नगर शहरातून शहराध्यक्षपदासाठीही अनेकजण इच्छूक आहेत. पण आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीवेळी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या तरी जिल्हाध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली सुरू असून आता कुणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Ahmednagar BJP
Ahmednagar News: नगर बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? 'ही' नावे चर्चेत

यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु असल्याचं बोललं जात आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com