Nandurbar News: आधी तरंगते दवाखाने...आता देणार स्पीडबोट!

Dr. Vijaykumar Gavit: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शहादा येथे ग्रामीण रुग्णालयाचे उद्‍घाटन केले.
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा केंद्र सरकारने (Centre Government) आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले आहे. या आदिवासी (Trible) दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा (Health Service) पुरविणाऱ्या आरोग्यकर्मींच्या (Dr. Vijaykumar Gavit) वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा नदीकाठावरील गावांना आरोग्यसेवा दिली जाणार आहे. (Health Minister Dr. Vijaykumar Gavit`s new initiative for Health in Trible area)

राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या वेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षांत दोनशेपेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती व टाटा इन्स्टिट्यूटच्या मदतीने नर्मदा नदीकाठावरील गावांनी स्पीडबोटीच्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार आहे.

Dr. Vijaykumar Gavit
Nashik News; भुसेंनी उलगडले गुपित...`या`मुळे मिळाले एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण!

त्यासाठी आवश्यकता पडल्यास आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. या सर्व निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसह इतर सुविधांशी वाड्यापाड्यातला माणूस जोडला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक वाड्यापाड्यात आणि गावात बारमाही रस्त्यांची निर्मिती येत्या दोन वर्षांत केली जाणार आहे. उद्‍घाटन झालेल्या ग्रामीण रुग्णालयास लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे.

आदिवासी भागात प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आरोग्य सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्यकर्मी यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचाही विचार सचिव स्तरावरील चर्चेत केला असल्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

फेस रीडिंगद्वारे हजेरी

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासोबतच या भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी वेळेत असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रीडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळावेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबविणार असल्याचीही माहिती या वेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.

Dr. Vijaykumar Gavit
Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या जिजाताई ठाकरे, के. डी. नाईक, गुलाब ठाकरे, राजीव जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया, ईश्वर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश पाटील, डॉ. राजेश वसावे, डॉ. गोविंद शेल्टे व नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com