Burning Bus; अनेकांना बाहर काढले मात्र `त्या` दोघांना वाचवू शकलो नाही!

अपघातात बस पेटल्यावर दिलीप गायधनी यांनी व्हीडीओ न काढता अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले.
Burned Accident bus & Dilip Gaidhani
Burned Accident bus & Dilip GaidhaniSarkarnama

नाशिक : नाशिक- पुणे (Nashik) महामार्गावर शिंदे -पळसे येथे टोलनाक्याजवळ एसटी बसचा (ST Bus) भीषण अपघात झाला. त्यात बसने पेट घेतला. तेव्हा जमलेल्या गर्दीने मोबाईल फोन काढून व्हीडीओ शुट केले. मात्र दिलीप गायधनी (Dilip Gaidhani) थेट मदतीसाठी पुढे धावले. त्यांनी जळत्या बसमधून अनेकांना बाहेर काढले. मात्र दोघांना काढता आले नाही. त्यांचा मृत्यू झाला, याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Dilip Gaidhani save bus passengers life in Accident)

Burned Accident bus & Dilip Gaidhani
Vinod Tawade : विनोद तावडे तयारीनिशी हिमाचलला गेले खरे, पण आकड्यांनी दिला धोका...

एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर जाऊन धडकली बस खाली दोन दुचाकीस्वार चिरडले गेले. बस ने पेट घेतला अन्‌ हे जखमी दुचाकीस्वार त्यातच होरपळले गेले. किंकाळ्या, मोबाईलधारक, आरडाओरड, बघ्यांची गर्दी, मदतीला धावणारे अल्प मात्र ती भावनेने काम करणारी.. कायम खंत राहिली अनेकांना बाहर काढले मात्र त्या दोन जणांना वाजवू शकलो नाही... हे बोल होते ते घटनास्थळी मदतीसाठी धावलेले दिलीप गायधनी यांचे...

Burned Accident bus & Dilip Gaidhani
Sushma Andhare: ऐनवेळी तब्येत खालावली तरी खासदार शिंदेच्या मतदारसंघात सुषमा अंधारेंची तोफ धडाडली...

एकीकडे पेट घेत असलेली बस तर दुसरीकडे बसमधील भयभीत झालेले प्रवासी अन त्यांनी सुरु केलेला आरडा-ओरडा असे चित्र घटनास्थळावर होते. यावेळी काही प्रवासी मोठ-मोठ्याने रडत होते. नातेवाइकांच्या नावाने किंचाळया मारत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघातस्थळाकडे धाव घेतली. प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाचे तीन बंबांनी आग विझविली. मात्र, दोघा दुचाकीस्वारांना बसला लागलेल्या आगीत आपला जीव गमवावा लागल्याने उपस्थित हळहळ व्यक्त करीत होते.

अपघातानंतर, पळसे येथील दिलीप गायधनी, दिनेश गोवर्धने, दिनेश एखंडे, संदीप एखंडे, अंकुश गायधनी आदींनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यात संदीप एखंडे यांच्या हातात काच गेल्याने ते जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

नाशिक- पुणे महामार्गावर शिंदे -पळसे टोलनाक्याजवळ बसला ज्या ठिकाणी भीषण अपघात झाला त्याठिकाणी व्यवसाय करणारे प्रत्यक्षदर्शी दिलीप गायधनी सांगतात, आम्ही दुकानात बसलो होतो. अचानक जोरदार आवाज ऐकू आल्याने दुकानाबाहेर येऊन पाहतो तर एक बस दुसऱ्या बसला धडकली होती. आम्ही कुठलाही विचार न करता अपघात स्थळाकडे धाव घेतली.

प्रथमतः बसमधून धूर येत होता. त्यामुळे ही बस पेट घेणार हे लक्षात आले होते म्हणून आम्ही बसमधील प्रवाशांना बाहेर काढायला सुरवात केली. बसची पुढची बाजू धडकल्याने मुख्य दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे मागील बाजूला असलेल्या आपत्कालीन मार्गाने प्रवाशांना बाहेर काढले. यासह मुख्य दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला अन् त्यातूनही प्रवाशांना बाहेर काढले. सर्व प्रवासी बसमधून बाहेर येताच क्षणात बसने पेट घेतला.

दोन दुचाकीस्वार बसखाली दबले गेले होते, अन् बसने पेट घेतला. क्षणात दुचाकीस्वारांना डोळ्यादेखत होरपळले गेले. आम्ही हतबल झालो होतो. त्या दुचाकीस्वारांचे प्राण वाचवू शकलो नाही, यांची मात्र मनात खंत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी दिलीप गायधनी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com