हसन मुश्रीफांनी निवडणुकीच्‍या तोंडावरच भाजपला घातला लगाम

जळगावला सत्ताधारी भाजप नेत्यांना असमान कामांचे वाटप नडले
Hassan Mushrif Political News
Hassan Mushrif Political NewsSarkarnama

जळगाव : जिल्हा परिषदेतील (Jalgaon) पदाधिकाऱ्यांनी २४ कोटी रूपये निधीचे असमान कामांचे वाटप केल्‍याच्‍या तक्रारीने कामांना स्‍थगिती देण्यात आली आहे. परंतु, केवळ याच कामांना स्थगिती न देता सन २०२१-२२ वर्षाच्या ९८ कोटी रुपयांच्या वार्षिक योजनांना स्थगिती दिली आहे. मात्र ही स्‍थगिती उठविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zillha Parishad) पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. (Hassan Mushrif Political News)

Hassan Mushrif Political News
मालेगावमध्ये आज पाळणार हिजाब दिवस!

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षातील मिळून १२ सदस्यांनीच आपसात २४ कोटींची कामे वाटून घेतल्याची तक्रार राष्‍ट्रवादीच्‍या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. निलम पाटील यांनी शासनाकडे केली होती. शासनाने या कामांच्या चौकशीचे आदेश देताना जिल्हा परिषदेच्या संपूर्ण वार्षिक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील संपूर्ण ९८ कोटी रुपयांची कामे प्रभावित झाली आहेत.

Hassan Mushrif Political News
गडकरींनी पुरस्कारासह ५ लाखांचा निधी संकटग्रस्त कांदा शेतकऱ्यांसाठी दिला!

यासंदर्भात तक्रार केवळ बांधकाम आणि सिंचन विभागाच्या कामांची असताना प्रत्यक्षात प्रशासनाने आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या संपूर्ण विभागांची २०२१-२२ या वर्षातील संपूर्ण ९८ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्याची मागणी ग्रामविकासमंत्र्यांना करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती जयपाल बोदडे, गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, नंदकिशोर महाजन, अमित देशमुख अध्यक्षांचे पती प्रल्हाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

जिल्‍हा परिषदेची निवडणूक कधीही लागण्याची शक्‍यता आहे. अर्थात निवडणुकीच्‍या तोंडावर संपूर्ण कामे थांबली आहेत. प्रशासनाने बिले थांबविल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत मुंबईकडे धाव घेतली. बुधवारी या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबतची वस्तुस्थिती मांडली. तक्रार २४ कोटींच्या कामांची असल्याने स्थगिती देखील त्याच कामांना द्यावी, जिल्हा परिषदेतील इतर कामे प्रभावित होऊ नये याबाबत शासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com