गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांनी शिवसेनेकडील रुग्णवाहिकाही परत घेतली...

Jalgaon: दोन्ही गटांतील वाद जळगावमध्ये विकोपाला..
Gulabrao patil
Gulabrao patilSarkarnama

जळगाव : शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यात सुरू असलेला वाद आता स्थानिक स्तरापर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जळगाव महानगर शिवसेनेला देण्यात आलेली रूग्णवाहीका आज शिंदे गटाने परत घेतली आहे.

शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी सांगितले कि, आज दुपारी पाऊण वाजता शिंदे गटात गेलेले राज्याचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचा आपल्याला आज दुपारी फोन आला व त्यांनी शिवसेनेला दिलेली रूग्णवाहीका परत द्या असे सांगितले. याबाबत आपण महानगर प्रमुख शरद तायडे यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी वरीष्ठ नेत्यांशी चर्चा केली व आपणास रूग्णवाहीका देण्यास सांगितले, त्यानुसार आपण चालकास फोन करून रूग्णवाहीकेची चावी प्रताप पाटील यांना देण्यास सांगितले, त्यानुसार दुपारी दोन वाजता ही रूग्णवाहीका त्यांना सुपूर्द करण्यात आली.

Gulabrao patil
सुहास कांदे एकटे पडले, कार्यकर्ते शिवसेनेसोबतच!

रूग्णवाहीका शिवसेनेला मिळण्याबाबत सुरळकर यांनी सांगितले, कि राज्याचे मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ही रूग्णवाहीका शहर शिवसेनेला मिळाली होती. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही रूग्णवाहीका दीड वर्षापूर्वी देण्यात आली होती. ऑक्सीजनची सुविधा असलेली ही रूग्णवाहीका शिवसेनेतर्फे जळगाव शहरासह इतर गरजूसाठी उपयोगात येत होती. ही रूग्णवाहिका मिळण्यासाठी त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हा प्रमुख ,महानगर प्रमुख आदीनी प्रयत्न केले होते.

महापौरांचीही धमकीची तक्रार!

महापौर जयश्री महाजन यांनीही पत्रकारांशी बोलतांना सांगितले, कि, शिवसेना सोडून तुम्ही शिंदे गटात सहभागी झालात तर जळगावचा विकास होईल, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल असे मेसेज आपणास मोबाईलवर येत आहेत. महापालिकेत काही नगरसेवक दुसऱ्या गटाला भेटलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मेसेज आले आहेत आपण जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले तर जळगाव शहराचा विकास अजून चांगल्या पध्दतीने होईल.नाहीतर जळगाव शहराचा विकास थांबविला जाईल कुठे तरी अडचणी निर्माण करण्यात येतील अशा प्रकारचे मेसेज मला येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com