ST Strike : कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेण्याचं कारण सदाभाऊ-गोपीचंदना विचारा

एस. टी. संप मागे घेतला परंतु अद्यापही कर्मचारी कामावर का येत नाहीत?
ST Strike :  कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेण्याचं कारण सदाभाऊ-गोपीचंदना विचारा
Gopichand Padalkar, Sadabhau Khotsarkarnama

जळगाव : एस. टी. कर्मचारी कामावर का येत नाहीत ते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना विचारल्यास एका मिनिटात उत्तर मिळेल असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. एस. टी. संप मागे घेतला परंतु अद्यापही कर्मचारी कामावर का येत नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.

गुलाबराव पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांना विचारल्यास एका मिनिटात उत्तर मिळेल की कर्मचारी कामावर का हजर होत नाहीत. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, एस टी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यात आली आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता कामावर रुजू व्हावे आणि आपल्या दुसऱ्या मागणीसाठी लढा सुरू ठेवावा. काही गोष्टींसाठी निश्चितच वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.

Gopichand Padalkar, Sadabhau Khot
ST Strike : आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची माघार!

दरम्यान आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून काल भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी ही घोषणा केली. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे.

विलीनीकरणाची लढाई न्यायालयात आहे, पण तोपर्यंत काहीसा दिलासा म्हणून सरकारने दिलेली वाढ म्हणजे कामगारांचा पहिल्या टप्प्यातील विजय आहे. मूळ वेतनामध्ये वाढ झाली आहे, मागच्या अनेक दिवसांपासून ही वाढ झाली नव्हती. तसेच महामंडाळाला पगारासाठी कमी पडणारा निधी राज्य शासन देईल आणि १० तारखेच्या आत पगार देण्यास सरकार बांधिल राहिल अशी भूमिका घेतली आहे. सोबतच सरकारने निलंबन, बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचाही निर्णय घेतला आहे. गैरहजर असलेल्या दिवसांच्या पगार देण्याची सरकारची भूमिका सरकारने घेतली आहे असेही खोत म्हणाले.

Gopichand Padalkar, Sadabhau Khot
कर्मचाऱ्यांना अखेरचा इशारा; उद्या सकाळपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in