Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon Politics| 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण ; म्हणाले...

Gulabrao Patil| मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील म्हणाले होते

जळगाव : जळगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमात केलं. ज्यामुळे ते चांगलेचं अडचणीत आले आहेत.“मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं विधान मंत्री पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन आता नवीन वाद निर्माण झाला असताना त्यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra Political news latest update)

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटल आहे. पण शिवसेनेने चुकीचा अर्थ काढून आंदोलन करणं हास्यास्पद आहे. ज्या वृत्त वाहिनीने प्रसारित केले, त्या वृत्तवाहिनीवर हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करणार आहे. मी कोणत्याही डॉक्टरबाबत बोललो नाही. पण वृत्तवहिनीन्यांनी तपासून बातम्या केल्या करायला हव्यात. त्यांच्यामुळे कोणाचे करिअर बरबाद होणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Gulabrao Patil
मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली;स्त्रीरोग तज्ञ कधीही...

आम्ही 50 खोके एकदम ओके आहोत, असंही वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. '' आमच्यावर सर्व बाजूने टीका होत आहे. आमची बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी सहजच 50 खोके तर खोके असं बोललो, असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच विधान परिषदेच्या निवडणूकीत आम्ही शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही मतदान केलं होतं तर त्यावेळी आम्ही पैसे घेतले होते का, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही केवळ मतदान केलं, तरीही आमच्यावर आरोप करत करत असाल तर मी बोललो पन्नास खोके तर खोके. पण याचा दुसरा अर्थ काढण्यात आला, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com