'मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सोडलं, 'वर्षा' बंगला सोडला पण पवारांना सोडायला तयार नाहीत'

Gulabrao Patil| Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेमुळे मंत्रीपद मिळाले हे निश्‍चित आहे. मात्र आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केल आहे.
Uddhav Thackeray & Gulabrao Patil  Latest News
Uddhav Thackeray & Gulabrao Patil Latest NewsSarkarnama

Gulabrao Patil : गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षातील घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी उद्या (ता.30 जून) बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीत असलेले सर्व 49 आमदार मुंबईत येणार आहेत. मात्र बंडखोर आमदार आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्ध काही थांबायचे नाव घेतांना दिसत नाही.

आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेकदा सांगितले मात्र त्यांनी आपल ऐकल नाही. त्यांनी आपल्याला सोडल, ‘वर्षा’ सोडलं परंतु ते शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडण्यास काही तयार नाहीत, अशी खोचक टीका बंडखोर आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली आहे. याबरोबरच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray & Gulabrao Patil Latest Marathi News)

Uddhav Thackeray & Gulabrao Patil  Latest News
बंडखोर आज जिंकलेही, तरी हा त्यांचा क्षणिक विजय; अन् भविष्यातला पराभव !

राज्यपाल कोश्यारींनी उद्या बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्यामुळे शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मुंबईत येणार आहेत, ते व्हाया गोवा मुंबईला येणार आहेत. गुवाहाटीवरून निघण्याआधी बंडखोरांची बैठक झाली त्या बैठकीत गुलाबराव पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्या सोबतचे आणि अपक्ष आमदार सभागृहात डिबेट करण्यासाठी त्यांना पुरेसे आहेत. हे होण्यापुर्वी ठाकरे यांना आपण याबाबत सर्व सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल काही ऐकले नाही. त्यांनी आपल्याला सोडलं, 'वर्षा' बंगला सोडला मात्र, ते अद्यापही शरद पवारांना सोडण्यास तयार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray & Gulabrao Patil  Latest News
घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, शिवसेना अजून देखील उद्धव ठाकरेंचीच

ते म्हणाले, आम्हाला उध्दव ठाकरेमुळे मंत्रीपद मिळाले हे निश्‍चित आहे. मात्र यासाठी आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केल आहे. कठीण परिस्थितीत आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य केले आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळण्यात आमच्याही कामाचा सहभाग निश्‍चितच आहे. आम्ही काही केवळ आयत्या बिळावर नागोबा झालेलो नाही. त्यामुळे आगामी काळासाठी आम्हा सर्वांना एकत्र राहूनच लढाई लढायची आहे. शिंदे याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवूया एवढीच आपण देवासमोर प्रार्थना करतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray & Gulabrao Patil  Latest News
मराठवाड्यातील काही बंडखोर सेनानेत्यांची राजकीय कारकिर्द संपू शकते...

दरम्यान, सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊतांनी पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसावे लागेल केलेल्या या टीकेला पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राऊत मला पुन्हा पानटपरीवर चुना लावत बसेल असे म्हणतात पण पानाला चुना कसा लावतात त्यांना माहित आहे का? वेळ आल्यावर मीच त्यांना नक्की चुना लावीन, असा इशाराही त्यांनी राऊतांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com