Jalgaon Politics| आदित्य ठाकरे गोधडीत पण नव्हता...; गुलाबराव पाटलांची पुन्हा जीभ घसरली

Jalgaon Politics| Gulabrao Patil| परिणामांचा विचार करणं राजकारणात चालत नाही,
Jalgaon Politics| Gulabrao Patil|
Jalgaon Politics| Gulabrao Patil|

जळगाव : शिंदे गटाच्या आमदारांची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. बुलडाण्यात झालेल्या राड्या नंतर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे.जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार भाष्य केले.

"हु इज आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हते तेव्हापासून आम्ही शिवसेनेत होतो. आमच्यावर टीका करण्याचा, आम्हाला गद्दार म्हणण्याचा आदित्य ठाकरेंना काय अधिकार?", अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

Jalgaon Politics| Gulabrao Patil|
शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; अंबादास दानवेंच गायकवाडांना प्रत्युत्तर

"शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आमच्यावर वारंवार टीका होत आहे. पण गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. जेव्हा कोणी झेंडा लावणारे नव्हते तेव्हा आम्ही होतो. मार खाणारे, तडीपार होणारे, जेलमध्ये जाणारे आम्ही, पण आज ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. अरे तो गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत", असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.

तुम्ही संपत्तीचे वारसदार होऊ शकता, पण विचारांचे वारसदार तुम्ही होऊ शकत नाही, विचारांचे वासरदार गुलाबराव पाटील आहे. तुमचं पक्षासाठी योगदान काय आहे ते सांगा, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण आदित्य ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला का अधिकार आहे आम्हाला गद्दार बोलण्याचा, गद्दार तर तुम्ही आहात. बाळासाहेबांनी आयुष्यभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात बोलले, पण आज तुम्हीच त्यांच्याशीच युती केली. अशी टीकाही यावेळी गुलाबराव पाटलांनी केली.

आम्ही तुमचं ऐकलं, तुमच्या मागे नतमस्तक होऊन आलो, पण आमदरांची काम गोत नाहीत अशा तक्रारी घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो, तेव्हा तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता लोक आम्हाला विचारतात, अब तेरा क्या होगा कालिया, अब जो होगा वो देखा जायेगा, परिणामांचा विचार करणं राजकारणात चालत नाही, अशी जोरदार फटकेबाजीही यावेळी गुलाबराव पाटलांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in