गुलाबराव पाटील, दोन हात करायला तयार रहा!

गुलाबराव पाटील म्हणजे नावात गुलाब, प्रत्यक्षात विषारी काटे अशी टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे.
गुलाबराव पाटील, दोन हात करायला तयार रहा!

नाशिक : शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना माध्यमांना बाईट देतांना नटी किंवा बाई म्हणून हिणवणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नावात फक्त गुलाब आहे. प्रत्यक्षात त्यांच्या अंगी विषारी काटेच जास्त आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP Women`s wing criticise Minister Gulabrao Patil On Sushma Andhare statement)

गुलाबराव पाटील, दोन हात करायला तयार रहा!
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

शिवसेनेचा सिनेमा चालण्यासाठी एखादी नटी किंवा बाई पाहिजे म्हणून सुषमा अंधारे यांना पिक्चर मध्ये आणले आहे. असे निर्लज्ज विधान पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

गुलाबराव पाटील, दोन हात करायला तयार रहा!
Bharat Jodo Yatra : तळपती मशाल हातात घेत राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. सुषमा अंधारे यांच्या जळगावातील शिवसेनेच्या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच परवानगी नाकारली. त्यामुळे सभा ऑनलाईन घेऊन अंधारेंनी पालकमंत्र्यावर सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप केला.

हा आरोप करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेनेला संपवत आहे अशी वल्गना पालकमंत्र्यांनी केली होती. वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामुळेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. राहिला प्रश्न शिवसेनेचा तर तुमच्या सारख्यांनीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्यातून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचले. यापुढील काळात शिवसेनेचा पिक्चर प्रसिद्ध (हिट) होण्यासाठी तुमच्यासारख्या गद्दारांना महाराष्ट्रातील जनता नाकारल्याशिवाय शांत बसणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा असा सल्ला देखील शहराध्यक्षा भामरे यांनी दिला.

त्या म्हणाल्या, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे हे जर आपण मान्य करत असाल, तर सुषमा अंधारे आणि समस्त महिलावर्गाची गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी. एक बाई म्हणून सोडून देतो माणूस राहीला असता तर बघितले असते असे बोलण्यापेक्षा आजची महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते याचा प्रत्यय आपणांस हवा असल्यास दोन हात महिलांशी करायला तयार रहावे, असे खुले आव्हान देखील आम्ही महिला भगिनी देतो.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com