Jalgaon Politics|गुलाबरावांची गाडी सुसाट ; दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Gulabrao Patil| शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी सट्ट्याचा अड्डा सुरू असलेलं कार्यालय उधळून लावलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो
 Gulabrao Patil|
Gulabrao Patil|

जळगाव : सध्या राज्यात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावरुन दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशात आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. पण त्यांचा सोनिया गांधी की शरद पवार यांच्या की इतर कोणाच्या विचारांचा आहे, असा खोचक सवाल करत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ''ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल. तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असेल, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. मग त्यांचं नात कोणाशी आहे, असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 Gulabrao Patil|
शिंदे गटापाठोपाठ शिवसेनेच्याही टार्गेटवर मंत्री रविंद्र चव्हाण...

कोणत्याही पक्षाचं कार्यालय हे न्याय देवतेचे कार्यालय असतं. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही चुकीची गोष्ट असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी सट्ट्याचा अड्डा सुरू असलेला कार्यालय उधळून लावल आहे, त्यांचं मी स्वागत करतो, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी वर्तमानपत्रात खड्ड्याबाबत जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.पालकमंत्री असताना १२५ कोटी रुपयांचा निधी देवूनही महापालिकेच्या वतीने खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांचाच पक्षाचा पदाधिकारी जळगाव शहरातले खड्डे दाखवत असल्याने शरमेची बाब आहे. असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेत सत्ता असलेल्या उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com