दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, पवारांचे विचार मांडू नका ;गुलाबराव पाटलांचा टोला

Dasara Melava : तीन तासांच्या सभेत काय लढाई? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे.
Mla Gulabrao Patil, Jalgaon News
Mla Gulabrao Patil, Jalgaon NewsSarkarnama

जळगाव : मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी (Shiv Sena Dasara Melava 2022) शिवसेनेला परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी मोठे विधान केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Gulabrao Patil latest news)

"आम्ही बीकेसी मैदानातील लढाईसाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी शिवतीर्थ मिळाले हे आम्ही मान्य केले आहे. त्यामुळे यात आम्ही लढाई जिंकलो वगैरे असे काही नाही. शिवसेना पक्ष कोर्टात गेला नव्हता, एक आमदार कोर्टात गेले होते. त्यांना परवानगी मांडली. त्यांना शिवतीर्थ मैदान मिळू नये, असे आम्ही कधीही म्हटलो नाही. त्यांची पण सभा होऊ द्या. चांगली गोष्ट आहे. फक्त त्याठिकाणी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडू नका," असा खोचक सल्ला पाटलांनी यावेळी विरोधकांना दिला.

Mla Gulabrao Patil, Jalgaon News
भाजपचा कोथळा काढायला निघालेले आता कुठल्या बिळात बसला आहात ? ; उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत ?

गुलाबराव पाटील म्हणाले, " तीन तासांच्या सभेत काय लढाई? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे. याला महत्त्व आहे. यासाठी खूप मोठी लढाई जिंकलो म्हणणं योग्य नाही. दसरा मेळाव्यात कुणाकडे जास्त लोकं येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे,"

दरम्यान आज (रविवारी) शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. "जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ईडी कारवाईला घाबरून शिवसेना सोडून गेले आहेत,ते तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते," असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

नशिराबाद येथे आयोजित सभेत बोलताना सावंत म्हणाले, "हे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत,हे जे गेलेत त्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलाविले होते. घाबरत,घाबरत दिल्लीला गेले तेथून परत मुंबईत आले, फोन केला साहेब, मला अडचण आहे, मी थांबू शकत नाही मला नोटीस दाखवली आहे त्यामुळे मला थांबता येणार नाही, मग घाबरून ते पळाले आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com