नाथाभाऊ, गिरीश भाऊ बंद करा युद्ध, जिल्ह्याचं भलं होणार नाही; गुलाबराव पाटील

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) व भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत.
Girish Mahajan- gulabrao patil- Eknath khadase
Girish Mahajan- gulabrao patil- Eknath khadase

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) व भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. या वादात आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao-patil) यांनी उडी घेत दोघांनाही समजदरीची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. या शाब्दिक युद्धाची पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मात्र आता या वादात शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे. 'या दोघांचे हे वाद जुने आहेत. त्यात मला पडायचे नाही. मात्र दोघांनी वाद वाढवल्यास या वादामुळे जिल्ह्याचंच भलं होणार नाही, असे मला वाटते. या उलट सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याचा विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Girish Mahajan- gulabrao patil- Eknath khadase
गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे : एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

काय आहे प्रकरण?

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, ईडीकडून (सक्तवसुली संचनालय) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता.

आता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कोरोना झाल्याचे जाहीर करताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढत पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महाजन याना कोरोना झाला ,असा टोला लगावला, त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी ''गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे,'' असा टोला लगावला. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com