गुलाबराव देवकरांचा सुटकेचा निश्वास; जिल्हा बँकेचे संचालकपद अबाधित

निवडणूक लढविण्याचा मार्गही मोकळा
गुलाबराव देवकरांचा सुटकेचा निश्वास; जिल्हा बँकेचे संचालकपद अबाधित
Gulabrao devkarSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर (Leader Gulabrao Devkar) यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. घरकुल प्रकरणात शिक्षा झाली असली तरी त्यांच्या शिक्षेस स्थगित देण्यात आल्याने त्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव करावा अशी मागणी करत दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देवकर यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा बँक संचालक पदावरचीही टांगती तलवार दूर झाली आहे.

गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर हरकत घेत पवन रामकृष्ण ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाठोपाठ विरोधी उमदेवार रविंद्र नाना पाटील यांनीही याच मागणीची याचिका केली होती. यात त्यांनी म्हटले होते की, धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करावा. त्यामुळे देवकर यांची जिल्हा बँक संचालक निवडणूकीत झालेल्या निवडीवरही टांगती तलवार होती.

Gulabrao devkar
गिरीश महाजन साईडट्रॅक करून एकनाथ खडसेंनी जळगाव बँकेचे मैदान मारलेच!

याबाबत माहिती देताना देवकर यांचे वकील महेश देशमुख यांनी सांगितले की, न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देवून याचिका फेटाळून लावली आहे. यात घरकुल प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्रात देवकर यांच्यावर केवळ दोन परिच्छेद दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, देवकर यांचा या प्रकरणात थेट सहभाग दिसून येत नाही. त्यांनी कोणत्याही धनादेशावर सह्या केल्या नाहीत, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा झाल्याचे दिसून येत नसल्याचा मुद्दा देवकर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हे सगळे दावे मान्य करत न्यायालयाने देवकर यांच्या बाजूने निकाल देत याचिका फेटाळून लावली आहे.

Gulabrao devkar
जळगाव जिल्हा बँक : सतीश पाटील, देवकर, खडसे विजयी ; सहकार पॅनलची बाजी

न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देवकर यांचे जिल्हा बँक संचालक पद कायम राहिले आहे. शिवाय आता पुढील निवडणूका लढविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे अशी माहिती ही अॅड. देशमुख यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती नागेश्वर राव व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणातील सुनावणी झाली. देवकर यांच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी, सुधांशू रॉय, महेश देशमुख यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in