जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची अन् बाजी मारली देवकरांनी

जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाले आहे.
Gulabrao Deokar and Shyamkanr Sonawane
Gulabrao Deokar and Shyamkanr Sonawane Sarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे (Shivsena) श्यामकांत सोनवणे (Shyamkant Sonawane) यांचे नाव निश्चित झाले आहेत. ते आता अर्ज दाखल करीत आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद आहे. मात्र, अनेकजण इच्छुक असल्याने पेच निर्माण झाला होता. आज सकाळी बँकेवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक आज होत आहे. सुरवातीचे तीन वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल हे सूत्र ठरले आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे (Eknath Khadse), रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची नावे चर्चेत होती. अखेर देवकरांनी यात बाजी मारली आहे.

Gulabrao Deokar and Shyamkanr Sonawane
पुण्यातील बड्या दुग्ध उद्योगावर 'आयटी'चे छापे अन् 400 कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड

बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक संचालक आहेत. त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. काल झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत नाव जाहीर झाले नव्हते. आज सकाळी निवडणुकीच्या आधी झालेल्या बैठकीत नाव निश्चित करण्यात आले. अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव अग्रस्थानी होते. विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता होती. तसेच, ऐनवेळी एकनाथ खडसे हेसुद्धा अध्यक्ष होण्याचे बोलले जात होती.

असा आहे फॉर्म्युला

याबाबत माहिती देताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला दोन वर्षे, काँग्रेसला दोन वर्षे व राष्ट्रवादी काँग्रेसला एक वर्षे देण्यात येणार आहे. याला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com