गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची जादू चालली धुळ्यात; लेकीचा दणदणीत विजय

खास विमानाने 27 सप्टेंबरला धुळ्यात आले होते.
MP Chandrakant Patil
MP Chandrakant Patil

धुळे : गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार चंद्रकांत पाटील यांची जादू धुळ्यात चालली आहे. त्यांची लेक व धुळ्याच्या भाजपच्या उमेदवार धरती निखिल देवरे यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत लामकानी (ता. धुळे) गटात दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा चार हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

पोटनिवडणुकीपुर्वी धरती देवरे या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती होत्या. लेकीच्या प्रचारासाठीही चंद्रकांत पाटील खास विमानाने 27 सप्टेंबरला धुळ्यात आले होते. पाटील यांनी बोरीस (ता. धुळे) येथे सभाही घेतली होती. त्यांनी सभेत जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधत गावातील लेकींचा सुकन्या योजनेंतर्गत पहिला हप्ता मी भरतो, असे आश्वासन दिले आहे. खासदार पाटील यांची ही जादू लामकानी गटात चालली आहे.

MP Chandrakant Patil
Nandurbar ZP Election: विजय गावितांनी गड राखला ; दुसरी मुलगी सुप्रिया जिल्हापरिषदेवर

महिला व बालविकास समिती सभापती असताना धरती देवरे यांनी केलेल्या कामाचा फायदाही झाला आहे. त्यांचे सासरे भाजपचे स्थानिक नेते सुभाष देवरे, पती उद्योजक निखिल देवरे, दीर व बोरीसचे माजी सरपंच विलास देवरे यांचीही भक्कम साथ लाभली. देवरे यांनी त्यांच्या गटात विकास कामांचा धडाका लावला होता. विशेष म्हणजे सुभाष देवरे यांचे भाचे कुणाल पाटील हे धुळे तालुका म्हणजेच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.

लामकानी गटात भाजपच्या धरती देवरे यांच्यापुढे शिवसेनेच्या मीनाबाई पाटील यांचं आव्हान होते. राज्यस्तरावरील महाविकास आघाडीमुळे लामकानी गटात शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला होता. महाविकास आघाडीमधील घटक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने धुळे तालुक्यात अंतर्गत सामंजस्यातून जागावाटप झाले होते.

MP Chandrakant Patil
Dhule ZP Election ; अमरीश पटेलांचा करिश्मा कायम ; आठही जागा भाजपकडे

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आठ गणांसाठी पोटनिवडणूक होती. त्यात भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीअंती सहा जागा भाजपने जिंकल्यामुळे आमदार अमरिश पटेल यांनी त्यांचे वर्चस्व अबाधित राखल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर शिरपूर पंचायत समितीमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com