Dada Bhuse News; दादा भुसे यांनी संजय राऊत यांची उडवली खिल्ली!

खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरील हल्ल्याची माहिती आत्ताच का दिली.
Dada Bhuse & Sanjay Raut
Dada Bhuse & Sanjay RautSarkarnama

नाशिक : (Nashik) शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतेच कारागृहातील (Central Jail) आपल्या मुक्कामादरम्यान आलेल्या अनुभवांविषयी वक्तव्य केले होते. याबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे शिवसेनेचे नेते, मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राऊत यांची खिल्ली उडवली आहे. (Eknath Shinde Group`s Dada Bhuse made a Serious coment on Sanjay Raut`s Statement)

Dada Bhuse & Sanjay Raut
Chhagan Bhujbal: `असा` निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली?

निवडणूक आयोगाने शविसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी देखील एकमेकांवर टिकेचे बाण सोडण्यास सुरवात केली आहे.

Dada Bhuse & Sanjay Raut
Dada Bhuse News: ...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोध करणार!

यासंदर्भात श्री. भुसे यांनी राऊत यांच्या एका वक्तव्याची खिल्ली उडविली . ते म्हणाले, जे संपादक अटकेच्या काळात तुरुंगातून अग्रलेख लिहून पाठवत होते. वेगवेगळ्या कमेंट सहजपणे माध्यमांपर्यंत पोहोचवत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचे का जाहीर केले नाही?. यासंदर्भात राऊत यांना सवाल करीत पालकमंत्री भुसे यांनी खासदार राऊत यांच्या हल्ल्याच्या विधानाची खिल्ली उडवली.

यावेळी त्यांनी राऊत हे मोठे नेते आहेत, ते तुरुंगात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बाहेरपर्यंत पोहोचवू शकले असते. मात्र, त्याबाबत ते आता सांगत आहेत. आम्ही त्यांना आधीपासून पाहत आलो आहे. आता त्यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी, एवढेच सांगावेसे वाटते, असा टोलाही भुसे यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in