Girish Mahajan : पालकमंत्र्यांची नियुक्ती तातडीने होईल!

गिरीश महाजन म्हणाले, बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हेच भाजपचे लक्ष्य.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) लोकसभेच्या (Loksabha) ज्या जागांवर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून, त्यातील एक बारामती (Baramati) लोकसभेची जागा आहे. त्यामुळे फक्त बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित करून पुढील निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष्य असल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. (BJP have plan to concentrate on allLoksabha Seats)

Girish Mahajan
MVP News: दर तीन महिन्यांनी शरद पवारांची भेट घेऊ!

नाशिकमध्ये श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीला श्री. महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीदेखील दिली जाणार आहे. यात विलंब होणार नाही. यापूर्वी अडकलेला निधी जिल्ह्यांना प्राप्त झाला आहे. लोकसभेच्या जागेवर भाजपचा पराभव झाला आहे, त्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

Girish Mahajan
Jalgaon News: मिरवणूकीत महापौरांच्या घरावर हल्ला करणारे अटकेत

ते म्हणाले, फक्त बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष आहे. सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा भाजपचा उद्देश आहे. देशात पुन्हा एकदा भाजपला कौल देऊन भाजपचा पंतप्रधान सत्तेत असेल. राज्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

भारतीय जनता पक्ष नेहेमीच संघटनात्मक वाढीवर विशेष लक्ष केंद्रीत केलेला पक्ष आहे. आज कार्यक्षम आणि सक्रीय कार्यकर्ते असलेला हा एकमेव पक्ष आहे. हे आम्ही वारंवार दाखवून दिले आहे. पक्ष मजबुत असला पाहिजे, हे धोरण काही गैर नाही, असे श्री. महाजन म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in