Dada Bhuse: पालकमंत्री दादा भुसेंनी महाविकास आघाडीवर उगवला सुड!

डीपीडीसी निधी वाटपाला दिलेली स्थगिती फक्त मालेगावसाठी रद्द करीत महाविकास आघाडीला सुडाची वागणूक.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आघाडीच्या आमदारांसाठी सढळ हाताने निधी दिला. शिंदे सरकार (Eknath Shinde Givernmant) येताच त्या विकास कामांमा स्थगिती देण्यात आली. कमाल म्हणजे दादा भुसे (Dada Bhuse) पालकमंत्री झाल्यावर त्यांनी स्थगिती उठवली मात्र फक्त स्वतःच्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातील कामांसाठी. त्यामुळे ते पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे की मालेगाव तालुक्याचे अशी चर्चा सुरु झाली आहे. (Dada Bhuse vacate stay for only Shinde group MLAs)

Dada Bhuse
नंदुरबारला पुन्हा फडकला एकनाथ शिंदेंचा झेंडा!

राज्यातील सत्तांतरानंतर जुलै महिण्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर शासनाने निर्बंध आणले होते. अद्यापही सगळ्या तालुक्यासाठी हे निर्बंध कायम असतांना जिल्ह्यातील १५ पैकी पालकमंत्री दादा भुसे यांच्या एकट्या मालेगाव तालुक्यातील १५ कोटीच्या स्थगिती असलेल्या विकासकामावरील बंदी मात्र उठविली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री भुसे यांच्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकुणच निधी वाटपातील पालकमंत्री भुसे यांच्या ‘दादा!गिरीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील इतर सगळ्या १४ तालुक्यावर मात्र अन्याय झाला आहे.

Dada Bhuse
एकनाथ शिंदे सरकारने दिलेले ९४० रुपये शेतकरी परत करणार!

राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतरानंतर जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या २०२२-२३ या वर्षातील निधीच्या नियोजनाला स्थगिती देण्यात आली. १ जुलैस राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागांना पत्र पाठवून एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या व निविदा प्रक्रिया न राबवलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्यातील सर्व विकासकामे ठप्प आहेत. राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या संमतीने कामांवरील स्थगिती उठवण्याचे स्पष्ट करण्यात आले.

कांदे यांची शिफारस

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये पुनर्नियोजनाच्या निधीतून मालेगाव व नांदगाव तालुक्यातील सुमारे १५ कोटींच्या रस्ते कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार व आमदार सुहास कांदे यांच्या पत्रानुसार घेतला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यात एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेल्या व कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांवरील स्थगिती कायम असताना नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव व शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार सुहास कांदे यांच्याच मतदारसंघातील विशिष्ट कामांवरील स्थगिती उठल्याने हा निर्णय पक्षपातीपणा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

चर्चा एक निर्णय भलताच

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेतील जिल्हा नियोजन भवनात १० तारखेला झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत, आमदारांनी निधी खर्चावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली असता पालकमंत्री दादा भुसे यांनी निधी वाटप करताना झालेल्या भेदभावाबाबत माहिती घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट करीत स्थगिती उठवण्यास नकार दिला. पण त्याचदिवशी त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या पत्राच्या अनुषंगाने नांदगाव व मालेगाव मतदारसंघातील (तालुका मालेगाव) ३०५४ व ५०५४ या लेखाशीर्षांतर्गत मार्च २०२२ मध्ये पुनर्नियोजनातून मंजूर झालेल्या सुमारे १५ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांना दिल्या.

पत्रानुसार नांदगाव व मालेगाव तालुक्यातील ३०५४ व ५०५४ या लेखाशीर्षातील १२ रस्ते कामांवरील स्थ्‌गिती उठवण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून या कामांच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. ही कामे एकूण १५ कोटींची असल्याचा अंदाज आहे. तर दुसरीडे मात्र एकट्या जिल्हा परिषदेचा नियोजन समितीकडून २०२१-२२ या वर्षात ७८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता असलेल्या पण निविदा न निघालेल्या ७८ कोटीच्या कामांचा निधी मार्च २०२३ पर्यंत खर्च करणे बंधनकारक आहे. अन्यथा तो निधी परत जाण्याचाही धोका आहे. त्यावरील स्थगिती कायमच आहे. केवळ पालकमंत्र्यांनी त्यांच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव आणि नांदगाव मतदार संघातील मोजक्याच निधीवरील स्थगिती उठवण्याचे आदेश दिल्याने पालकमंत्र्यांकडूनच जिल्ह्याच्या पालकत्वाची भूमिका निभावण्यापेक्षा इतर आमदारांवर अन्याय ठरणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com