अहो चिमणराव, सरकार आपल आहे, विरोधात नका बोलू!

‘ट्रान्सफॉर्मर’च्या वादावरुन आमदारांनी दिला पालकमंत्र्यांना घरचा आहेर.
Gulabrao Patil & Chimanrao Patil
Gulabrao Patil & Chimanrao PatilSarkarnama

जळगाव : ग्रामीण असो वा शहर वीजेच्या प्रश्नावरून सध्या सगळीकडे वाद-विवाद सुरु आहेत. त्याचे पडसाद गुरूवारी जळगावच्या (Jalgaon) नियोजन समितीतही उमटले. आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी याबाबत तक्रारी केल्या, तेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, अहो हे आपल सरकार आहे. आपणच विरोधी बोललं तर कसे चालेल?.

Gulabrao Patil & Chimanrao Patil
राज ठाकरेंचा राज्यात दबदबा, मात्र `या`मुळे धुळ्यात इंजिन साईडींगला!

गुरुवारी जळगाव नियोजन समितीची बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र वीजेच्या प्रश्नावर चर्चेचा नुरच बदलला. बिले भरूनही ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (ता. १३) झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनीही याबाबत तक्रार करत सरकारला घरचा आहेर दिला.

Gulabrao Patil & Chimanrao Patil
अब्दुल सत्तार पालकमंत्री, तीथे अधिकारी निधीच खर्च करेनात!

तक्रार करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘आबासाहेब.. सरकार आपल आहे, आपणच विरोधात बोलू तर कस चालेल’ अशा शब्दात चिमणराव पाटलांना चिमटा घेतला. त्यावरुन दोघा नेत्यांमधील छुप्या वादाचा प्रत्यय दिसून आला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ऑनलाइन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

महावितरणला जिल्हा नियोजन मंडळाने २२ कोटींचा निधी देऊन, व शेतकऱ्यांनी बिले भरूनही ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याची तक्रार चिमणराव पाटील यांनी बैठकीत केली. अन्य सदस्यांनीही ग्रामीण भागातील विशेषत: कृषीपंपांना होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत तक्रार करत महावितरणाच्या अभियंत्यांना धारेवर धरले.

शहरातील रस्त्यांसाठी ‘डीपीआर’

सदस्य तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी शहरातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याची दुरुस्ती व्हावी आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हटवून भुयारी केबल टाकाव्यात. तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक जळगाव शहरात विविध कामांसाठी येत असतात. त्यामुळे नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यात जळगावसाठी निधीची तरतूद दुप्पट म्हणजे ३५ वरुन ७० कोटी करण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना याबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना दिल्या.

आराखड्यात पाणी टंचाईसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. मात्र, दरवर्षी तात्पुरती व्यवस्था करण्यापेक्षा स्त्रोत शोधून कायमस्वरूपी पाणी या विषयावर तोडगा काढावा असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य नियोजन समिती बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी करण्याचे आश्वासन दिले.

महावितरण दाद देत नाही

महावितरणचे अधिकारी कुठलीही दाद देत नसल्याची तक्रार आमदार किशोर पाटील यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत ट्रान्सफॉर्मरचा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in