NCP News; `राष्ट्रवादी`च्या दणक्याने राज्य सरकार पोहोचले थेट बांधावर!

कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शनासह महामार्ग ठप्प करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन
Sameer Bhujbal
Sameer BhujbalSarkarnama

नाशिक : (Nashik) कांदा (Onion) प्रश्नावर रोज विविध भागात शेतकरी (Farmers) आंदोलन करीत आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) नाशिकच्या दौऱ्यावर होते. हाच मुहूर्त पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) चांदवडला (Chandwad) मोठे शक्ती प्रदर्शन करीत महामार्ग ठप्प केला. या दबावामुळे विधीमंडळ अधिवेशन सुरु असतानाही पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) थेट पाहणीसाठी कांदा उत्पादकांच्या बांधावर पोहोचले. (NCP deemands immediate grant for onion farmers)

Sameer Bhujbal
Sharad Pawar News; नागालँडमध्ये भाजपला पाठींबा दिलेला नाही!

कांदा, भाजीपालासह इतर शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गॅस, पेट्रोल डीझेलच्या होत असलेल्या दरवाढीमुळे महागाई देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांदवड चौफुलीवर आज रास्ता रोको करण्यात आला.

Sameer Bhujbal
Onion News; कांद्याच्या माळा घालून शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

यावेळी समीर भुजबळ पुढे म्हणाले की, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली आहे. भाजीपाला व इतर शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आपल्या शेती पिकांवर नागर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

त्यात अवकाळीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरासह अनेक पिकांचे मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधीपक्षनेते अजितदादा पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Sameer Bhujbal
Jalgaon District Bank: नगरचा धडा घेत ‘राष्ट्रवादी’ने भाजपला दूरच ठेवले!

त्यांतर नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात सुरुवात करण्यात आली. ती मोजक्याच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा अद्यापही शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे नाफेडने बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, गॅस, पेट्रोलसह, दैनदिन लागणाऱ्या वस्तूंचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. कांद्याबरोबरच भाजीपाला व इतर शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी सर्वसामान्य नागरिक महिला अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.

Sameer Bhujbal
Satyajeet Tambe News: खर्चाचा बाऊ न करता जुनी पेन्शन लागू करा!

शासनाने कांद्यासह शेतमाला हमीभाव द्यावा, गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखावी, अवकाळी ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जोपर्यंत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार, आमदार दिलीप बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दिपीका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com