पालकमंत्री दादा भुसे दुजाभाव करतात : शेख

मालेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रशीद शेख यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केला.
Rashid Shaikh
Rashid ShaikhSarkarnama

मालेगाव : शहरातील (Malegaon) विकासकामांमध्ये पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गेल्या २० वर्षाच्या काळात दुजाभाव (Hurt city devolopment) केला. त्यांनी रमजानपुरा, दरेंगाव, म्हाळदे या भागात कामच केले नाही. शहरातील होत असलेले कामासाठी निधी हा महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Front) काळात मंजूर झालेला आहे. श्री. भुसे कामात दुजाभाव करीत असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांनी पत्रकार परिषदेत केला. (NCP Leader rashid shaikh criticised Minister Dada Bhuse)

Rashid Shaikh
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

श्री. शेख म्हणाले, महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्या कार्यकाळात शहर विकासासाठी २०० कोटी रुपये मंजूर केले होते. तोच निधी श्री. भुसे यांनी शंभर कोटीवर आणला.

Rashid Shaikh
राज ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टची महापालिकेने केली दुरावस्था

शहरातील विविध कामांमुळे महापालिकेवर ४२ कोटीचा भार पडणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील रस्त्यांच्या काँक्रीटकरणासाठी साडेपंधरा कोटीचा निधी दिला होता. या निधीतून येथे रस्ते काँक्रीटीकरण होत आहेत. पालकमंत्री श्री. भुसे हे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करीत आहेत. येथील आयुक्त चुकीची कामे करतात, असे सांगत त्यांनी आयुक्तांविरुद्ध गैरव्यवहाराचे आरोप केले.

आयुक्तांच्या पाठीवर मंत्र्यांच्या हात आहे. मंत्र्यांनीच त्यांना येथे आणले. श्री. गोसावी यांची कोरोनाकाळातील कामाची चौकशी कॅगमार्फत होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवेदन देणार आहे. येथील घनकचरा वसुलीसाठी घरपट्टीत ६०० रुपयांची वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ येथे ९ नोव्हेंबरला आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अस्लम अन्सारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in