Sureshdada Jain news; भव्य स्वागतामुळे जळगावात पुन्हा सुरेशदादा जैन पर्व?

पाच वर्षांनी जळगावात आलेल्या सुरेशदादा जैन यांचे प्रचंड हजारोंकडून जल्लोषात स्वागत
Sureshdada Jain with supporters
Sureshdada Jain with supportersSarkarnama

जळगाव : तब्बल पाच वर्षांनंतर जळगाव (Jalgaon) शहरात आगमन झाल्यानंतर सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) यांचे जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. हजारोंचा जनसमुदाय या वेळी उपस्थित होता. या स्वागतामुळे जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा सुरेशदादा जैन पर्व सुरू होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेने जैन समर्थक आनंदात आहेत. (Will Sureshdada Jain enters in Jalgaon politics again?)

Sureshdada Jain with supporters
Sureshdada Jain news; जैन आज जळगावात, भाजप नेते झाले सावध

या स्वागताने भारावलेले जैन यावेळी म्हणाले, आपली राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा नाही. मार्गदर्शक म्हणून आपण काम करणार आहोत. मात्र, जनतेच प्रेम पाहून आपण कुटुंबाशी चर्चा करून पुढील वाटचालीची दिशा ठरविणार आहोत.

Sureshdada Jain with supporters
Sanjay Raut News; हेमंत गोडसे मच्छर आहे, त्याला कोणीही पराभूत करेल!

घरकुल प्रकरणात नियमित जामीन मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आमदार सुरेशदादा जैन मुंबई येथून जळगावात दाखल झाले. रात्री पावणेनऊला राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे ढोलताशे वाजवून व फुले उधळून स्वागत केले.

सुरेशदादा जैन यांना पाहण्यासाठी अक्षरक्ष: गर्दी झाली होती. काही जणांनी त्यांना उचलून घेतले आणि त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. रेल्वे प्लॅटफॉर्मपासून तर थेट बाहेरच्या गेटपर्यंत लाल कारपेट टाकले होते. त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक करीम सालार, माजी आमदार मनीष जैन, आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना सुरेशदादा जैन म्हणाले, की जळगावकरांचे प्रेम पाहून माझ्याकडे शब्द नाहीत. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मात्र, असे स्वागत आणि एवढी गर्दी मी अनुभवली नाही. मी घरी आल्यानंतर देवाचे दर्शन घेतले. माताजींचा आशीर्वाद घेतला आणि ‘जळगावकरांचे भले होवो’, हीच इच्छा व्यक्त केली. मी अद्याप राजकारणात सक्रिय होण्याचा विचार केलेला नाही. मार्गदर्शक म्हणूनच आपण राहणार आहोत. मात्र, जळगावकरांचे प्रेम पाहून, तसेच घरच्यांशी चर्चा करून आपण राजकारणात येण्याबाबत पुढे निर्णय घेऊ.

जळगावच्या विकासाकडे लक्ष देऊ

आपण गेली ४० वर्षे राजकारणात आपल्या परीने काम केले असल्याचे सांगून ते म्हणाले, की आपण चांगले काम केले आहे. मात्र, दुर्दैवाने सध्या जळगाव खड्ड्यांचे शहर आहे, असे म्हटले जाते त्यावेळी वाईट वाटते. आता आपण विकासाकडे लक्ष देऊ. विकास काही जादूची कांडी नाही. मात्र, तो निश्‍चित होईल. राजकारणात येण्यास आपल्याला घरच्यांचा विरोध आहे. मात्र, आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय ते ठरवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com