Grampanchayat News; राष्ट्रवादी काँग्रेसच नंबर वन!

ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा
Elected candidates celebration
Elected candidates celebrationSarkarnama

नाशिक : (Nashik) जिल्ह्यातील १९६ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat elections) निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर भारतीय जनता पक्ष, (BJP) तिसऱ्या स्थानावर माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shivsena) यांचे समर्थक, तर चौथ्या स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक राहिले. मतदार आणि उमेदवार दोघांचाही कल स्थानिक आमदार ज्या पक्षाचा त्या गटाला सत्ता असे राहिले. (Local MLA`s impact reflect in Grampanchayat election result)

Elected candidates celebration
Dada Bhuse News; दादा भुसे समर्थकांनी महाजन समर्थकांचा सहज पराभव केला

जिल्ह्यात १९ सरपंच आणि ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीतून सर्वाधिक जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने वरचष्मा राखला आहे.

Elected candidates celebration
Rahul Aher news; चांदवडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपला थकवले

दुसऱ्या स्थानावर भारतीय जनता पक्ष, तिसऱ्या स्थानावर माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक, तर चौथ्या स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक राहिले असून अपक्षांनी पाचवे स्थान पटकावले आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेचे समर्थक सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसने आपले अस्तित्व राखत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका ठिकाणी खाते उघडले.

ग्रामपंचायतींचे ५७९ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. १ हजार २७९ सदस्यांच्या जागांसाठी २ हजार ८९७, तर सरपंचांच्या १७७ जागांसाठी ५७७ उमेदवार नशीब अजमावत होते. पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपचे अद्वैय हिरे यांच्या समर्थकांचे मालेगावमध्ये फिफ्टी-फिफ्टी यश मिळाल्याचे निकालातून पुढे आले. दाभाडीमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती, तर सौंदाणेमध्ये भाजपच्या मनीषा रत्नाकर पवार यांचे कुटुंबीयातील सदस्य, नांदगावमध्ये मूळडोंगरीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे समर्थक, नागापूरमध्ये माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल, नाशिकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव धनवटे यांना पराभवाचा धक्का बसला. पेठमधील निरगुडे (क) ग्रामपंचायतीत काँग्रेसचे माजी खासदार सीताराम भोये यांच्या कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला आहे. नागापूरमध्ये श्री. पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांच्यासह पॅनलने बाजी मारली. श्री. राजेंद्र पवार हे भाजपचे असले, तरीही त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटाचे समर्थन केले.

चांदवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे विजयाचा दावा करण्यात आला आहे. बागलाणमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप बोरसे यांच्या समर्थकांपेक्षा अधिक जागा मिळवल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे केला जात आहे. निफाडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीपराव बनकर यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंतसह कसबे सुकेणे, पिंपळस, चांदोरीमध्ये विरोधकांनी बाजी मारली. पिंपळगावमध्ये भास्करराव बनकर यांनी आव्हान उभे केले. तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी दोन, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समर्थकांनी तीन जागांवर यश मिळवले.

राजकीय घडामोडी

सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ॲड माणिकराव कोकाटेंच्या पेक्षा उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंच्या समर्थकांनी आघाडी घेतली. इगतपुरीमध्ये वासाळीत पतीनंतर सरपंचपदी पत्नीने बाजी मारली. नाशिक तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसतर्फे विजयाचा दावा करण्यात आला आहे. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी समान मते मिळाल्यावर चिठ्ठी काढण्यात आली. त्याद्वारे विजय मिळालेल्या उमेदवारांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलाचे पाय धरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com