राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर

नगर जिल्ह्यात अद्यापही कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सगळीकडे तसे चित्र दिसून येत आहे.
राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर
Abdul Sattar, Revenue MinisterSarkarnama

नगर : नगर जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Covid19 epidemic in Nagar district is still not in control) सगळीकडे तसे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी बहुतांश गावे सील (Many villages seal to control covid19 epidemic) करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र राज्याच्या मंत्र्यांनाच कोरोनाचे भान राहिले (But Minister themself careless o it) नसल्याचे दिसून येत आहे.

Abdul Sattar, Revenue Minister
परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल

धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे आज धुळे दौऱ्यावर होते. या दरम्यान मंत्री सत्तार यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्टेजवरती बसलेल्या सर्व मान्यवरांना कोरोनाचा विसर पडल्याचे बघावयास मिळाले.

Abdul Sattar, Revenue Minister
आता फक्त मोदींच्या खुर्चीचा लिलाव बाकी आहे!

मंत्री सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या कुणालाही कोरोनाचे भान राहिल नसल्याचे दिसून आले आहे. मंचावर बसलेल्या एका्याही नेता, कार्यकर्त्याच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत परंतु दुसरीकडे मात्र राज्य सरकार मधील मंत्र्यांनाच त्याचं भान राहिलं नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव का वाढणार नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला जात आहे.

...

Related Stories

No stories found.