शासकीय भूखंडाच्या १ हजार कोटीच्या घोटाळ्यात कोण अडकले आहे?

भाजपा नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांची सीआयडी चौकशीची मागणी
शासकीय भूखंडाच्या १ हजार कोटीच्या घोटाळ्यात कोण अडकले आहे?
ADV. Ashish ShelarSarkarnama

मुंबई : वांद्रे पश्चिम (Bandra Band Stand) येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी असलेला एक एकरचा शासकीय मालकीचा भूखंड (Government Plot) रूस्तमजी ब्लिल्डरला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे. या व्यवहाराला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरुन कुणाचे आर्शिवाद आहेत, असा सवाल भाजपा (BJP) नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी केला.

ADV. Ashish Shelar
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी!

अॅड शेलार यांनी हा एक हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची भाजपाकडून पोलखोल सभांच्या माध्यमातून करण्यात येत असून याच श्रुखंलेतील एक पत्रकार परिषद आज आमदार अ‍ॅड. शेलार यांनी घेतली.

ADV. Ashish Shelar
आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

शासकीय भूखंड कवडीमोल दराने सरकारने विकला व त्यात भ्रष्टचार केला असा दावा आमदार अ‍ॅड. शेलार यांनी केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात ६५ गुंठे क्षेत्र असलेला भूखंड १९०५ पासून दी बॅड्रा पारसी कॅानवलेसमेंट होम फॅार वुमेन अँड चिल्ड्रन्स चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेला भाडे पट्यावर देण्यात आला होता.

या ट्रस्टने त्या कामासाठी जागेचा वापर केलाच नाही. हा भाडेपट्टा १९८० मध्ये संपला. मुंबई महापलिकेच्या २०३४ च्या विकास आराखडयात या जागेचे आरक्षण पुर्नवसवन केंद्र असे आहे. ट्रस्टचा भाडेपट्टा करार संपल्यामुळे ही जागा सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया होत असतानाच २०२० साली ही जागा विकण्याची जाहीरात काढण्यात आली. त्यानंतर २०२२ पर्यंत सरकारने ही जागा विकण्याच्या सर्व परवानग्या दिल्या. यामध्ये मंत्रालयातल सहाव्या मजल्यावरील कुठल्या मंत्र्यांच्या आर्शिवादाने हा व्यवहार करण्यात आला असा सवाल आमदार त्यांनी केला.

ते म्हणाले, रुग्ण सेवेसाठी देण्यात आलेला हा भूखंड संबंधीत ट्रस्टने रुस्तमजी या विकासकाला २३४ कोटी रुपयांना विकला. जागेचे मुल्यांकन करणाऱ्यांनी त्याचे मुल्य ३२४ कोटी निश्चित केले. जे बाजारमूल्यानुसार कमी आहे. त्यापेक्षा ही कमी दराने त्याची विक्री झाली. त्यामुळे मुद्रांक शुल्कातून शासनाला मिळणार महसूलही कमी मिळाला. सदर जागेच्या मुल्याचे बाजारभाव आणि विकास नियंत्रण नियमावली नुसार मिळणाऱ्या एफएसआयचा विचार केला तर सर्व खर्च वजा करता या विकासकाला एक हजार तीन कोटी रुपये फायदा होईल, असा अंदाज आहे.

ऐतिहासिक वास्तू असा दर्जा दिलेली वास्तू या जागेत असतानाही हा भूखंड विकासकाला विकण्यात आला. बिल्डरकडून ट्रस्टला केवळ बारा हजार चौरस फुट बांधकाम मिळणार आहे. बिल्डरला विक्रीसाठी एक लाख ९० हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.