पाकिस्तानच्या ताब्यातील डहाणूच्या मच्छीमारांची तात्काळ सुटका करा!

आमदार विनोद निकोले यांनी पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी पत्र लिहिले.
MLA Vinod Nikole
MLA Vinod NikoleSarkarnama

शाहरूख मुलाणी

MLA Vinod Nikole
Crime: १४ लाखांचा गांजा पिकवणाऱ्या वृध्दाची कारागृहात आत्महत्त्या

यावेळी आ. निकोले म्हाणाले की, पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने 'पुस्ती कृपा' व 'मत्स्यगंधा ९' या २ भारतीय मासेमारी बोटी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील १६ मच्छिमारांना त्यांच्या हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यातील ७ जण पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच्या गावातील आहेत.

MLA Vinod Nikole
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जाणार तरी कोण?

प्रथमच महाराष्ट्रातील मच्छिमार एवढ्या मोठ्या संख्येने पकडले गेले आहेत; मात्र हे मच्छिमार भारतीय हद्दीत असूनही त्यांना पकडल्याचा दावा गुजरातमधील मांगरोळ येथील बोटमालक मुळजीभाई खोरावा यांनी केला आहे. याबाबत बोटीच्या मालकांपर्यंत ही खबर आली आहे. पकडण्यात आलेल्या २ बोटींवर अनुक्रमे ९ व ७ मच्छिमार होते. ७ जणांपैकी ६ जण डहाणूजवळच्या अस्वली गावाजवळील आहेत. नवस्या महादा भीमरा, सरित उमरसादा, विजय नगवासी, जयराम ठाकर, उमजी पाडवी, विनोद कोल हे एका गावातील असून कृष्णा रमण भुजाड हे अन्य एका गावचे आहेत. अशी माहिती बोटमालक मुळजीभाई खोरावा यांना मिळाल्याचे कळतंय.

नमूद मच्छिमारांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी मच्छिमार कुटुंबीय आणि बोटमालकांसहित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत. २७ सप्टेंबरला पकडलेल्या बोटीतील मच्छिमारांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

एखादा मच्छिमार पकडला गेला की त्याला पाकिस्तानच्या तुरुंगात साधारण दीड ते दोन वर्षे खितपत पडावे लागते, असा साधारण अनुभव आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने या प्रश्नी केंद्र सरकारवर जास्तीतजास्त दबाव आणण्याची गरज आहे. या प्रकाराने, गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील श्रीधर चामरे या मच्छिमाराचा पाकिस्तानी मेरिटाइम एजन्सीने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता, त्याची आठवण ताजी झाली आहे.

त्याच्या कुटुंबियांना अद्याप कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळालेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तसेच या विषयावर माकप महासचिव कॉ. सीताराम येचुरी व पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे हे केंद्र सरकार सोबत चर्चा करतील ही माहिती आमदार निकोले यांनी दिली.

याप्रसंगी माकप जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत घोरखाना, डहाणू शहर सचिव धनेश अक्रे, राजेश जाधव, कमलेश राबड, राजेश दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com