Nashik News; संपादित जमिनी शेतकऱ्यांना तातडीने परत द्या!

आमदार हिरामण खोसकर यांची हिवाळी अधिवेशनात आग्रही मागणी
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama

नाशिक : वैतरणा धरण (Irrigation Projects) प्रकल्पातील बांधकामासाठी शासनाने (Maharashtra) अतिरिक्त जमिनी संपादित केल्या. यातील विविध जमिनी वापराविना पडून आहेत. या जमिनी शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने परत देण्यासाठी सरकारकडून गतिमान हालचाली करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) दाखला देत आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी केली. (MLA Hiraman Khoskar Deemands land for project affected frmers)

Hiraman Khoskar
Trible news; आमदार पाडवींनी सुचवला आदिवासी स्थलांतरावर `हा` उपाय!

इगतपुरी तालुक्यातील अनेक जमिनी राष्ट्रीय विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादित झाल्या आहेत. उर्वरित जमिनीवर उपजीविका करण्यासाठी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरण क्षेत्रातील फुगवटाधारक भूसंपादित जमीन शेतकऱ्यांना मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नागपूरच्या अधिवेशनात केली.

Hiraman Khoskar
Kirit Somaiya : असे आहेत किरीट सोमय्यांचे नव्या वर्षातले नवे संकल्प !

याबाबत ते म्हणाले, या जमिनी परत मिळवून देण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून वैतरणा येथे बैठक घेतली होती. त्यात तत्कालीन सरकारकडून विशेष प्रयत्न करताना बैठकांअंती विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी यांना जमिनीचे मूल्यांकन, मोजमाप करण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी मागील सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती, मात्र सरकार बदल्याने त्यावरील पुढील कार्यवाही संथ गतीने सुरू असल्याने जमिनीचे मूल्यांकन व मोजमाप करण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी लक्षवेधीदरम्यान केली.

त्याचबरोबर नाशिक महापालिकेसह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी वैतरणा धरणातून मुकणे धरणात पाणी वळवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू असून तत्पूर्वी वैतरणा धरण क्षेत्र मधील ६२३ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनास तातडीने आदेश पारित करावे, अशी आग्रही मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी केली. माझा मतदारसंघ आदिवासी व त्यातही धरणे, राष्ट्रीय विकासासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादित झाल्याने बेरोजगारी, भूमिहीन शेतकरी संख्या वाढली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याचेही खोसकर यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री यांना निवेदन देण्यात येऊन यावर तातडीने कार्यावाही करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in