NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, आदिवासींनी तातडीने भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना निवेदन दिले.
NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!

नाशिक : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ७५ हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, आदिवासी बांधवाना (Tribles) खावटी अनुदान द्यावे यासह विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेऊन केल्या. (NCP delegation meet Governer on farmers issue)

NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!
Shivsena News: ...आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या डोळ्यात अश्रू तरळले

विरोधी पक्षाचे नेते व विधिमंडळ सदस्यांनी श्री. पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काल राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी निवेदन दिले.

NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!
Malegaon News: भाजपने राज्यपालांची हाकालपट्टी न केल्यास महागात पडेल

आदिवासी कुटुंबाना सध्यास्थितीत खावटी कर्ज योजना बंद आहे, ती सुरु करावी अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा यांनी केली. शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले संकट लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाडा व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार मदत द्यावी, फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख तात्काळ मदत करावी. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. पांरपांरिक व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे. शंभर टक्के आदिवासी तालुके असलेल्या कळवण व सुरगाणा या दोन्ही तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घरांची पडझड होऊन नागरिकांचे व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. श्री. पवार यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, आमदार अनिल पाटील, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, सुनील भुसारा आदी शिष्टमंडळात सहभागी होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com