ऊसाप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला राजाश्रय मिळावा

रूई (निफाड) येथे झालेल्या कांदा परिषदेच्या पार्श्वभूमीवर श्री खोत यांनी सरकारच्या कांदा धोरणावर टिका केली.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

नाशिक : शेतकरी संघटनेच्या (Farmers Oragnisation) पुढाकाराने चाळीस वर्षांपूर्वी रूऊ (ता. निफाड) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्य़ांची पिरषद झाली होती. या पार्श्वभूमीवर आज भाजप (BJP) नेत्यांच्या पुढाकाराने कांदा परिषद होत आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khoth) यांसह विविध नेते त्याला उपस्थित होते. (Sadabhau Khot excepects onion growers shall be protect)

Sadabhau Khot
दरडोई उत्पन्नात बांगलादेशने भारताला मागे टाकले!

यासंदर्भात श्री. खोत म्हणाले, निफाडच्या रुई गावात १९८२ नंतर पुन्हा एकदा कांदा परिषद आज होत आहे. कधी कांदा रडवतोय कर कधी कांदा हसवतोय अशी स्थितीत सतत असते. त्यात शेतकरी नेहेमीच अडचणीत सापडतो. निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. त्यामुळे त्याच्या प्रश्नावर या पिरषदेत चर्चा झाली पाहिजे, असा सगळ्यांचा आग्रह आहे.

Sadabhau Khot
थापा मारणा-या पालकमंत्र्याला जनता भूलणार नाही!

ते पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. आजच्या परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार आहोत.

या धोरणावर विचार झाला नाही तर मग त्यासाठी आरपारची लढाई लढणार आहोत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांदा टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत तरी मी एकल नाही. कांदा जीवनावश्यक वस्तू मधून वगळावे ही आमची मागणी आहे. आमची ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी, अशी अपेक्षा श्री. खोत यांनी व्यक्त केली.

अर्थात श्री. खोत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. ते म्हणाले, राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे. कांदा प्रश्नावर आम्ही त्यांना स्वस्थ बसू देणार नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com